\id 1JN - Biblica® Open Marathi Contemporary Version \ide UTF-8 \h 1 योहान \toc1 योहानाचे पहिले पत्र \toc2 1 योहान \toc3 1 योहा \mt1 योहानाचे पहिले पत्र \c 1 \s1 जीवनी शब्दाचा अवतार \p \v 1 जे प्रारंभीपासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिले आहे, ज्याच्याकडे आम्ही लक्षपूर्वक पाहिले आहे आणि आमच्या हातांनी स्पर्श केला आहे; जीवनाच्या वचनासंबंधी आम्ही ही घोषणा करीत आहोत. \v 2 जे जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले आहे आणि त्याचीच साक्ष देतो आणि तुमच्यासाठी सार्वकालिक जीवनाची घोषणा करतो; जे पित्याजवळ होते आणि आमच्यासाठी ते प्रकट झाले आहे. \v 3 आम्ही जे पाहिले व ऐकले आहे तेच तुम्हाला सांगत आहोत, यासाठी की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर सहभागी व्हावे. आमची सहभागिता पित्याबरोबर आणि त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर आहे. \v 4 आम्ही हे लिहित आहोत यासाठी की, आमचा आनंद परिपूर्ण असावा. \s1 प्रकाश आणि अंधार, पाप आणि क्षमा \p \v 5 हा संदेश आम्ही त्यांच्याकडून ऐकला आहे आणि तो तुम्हाला घोषित करतो, परमेश्वर प्रकाश आहेत; त्यांच्यामध्ये अजिबात अंधार नाही. \v 6 जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही. \v 7 परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व\f + \fr 1:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa प्रत्येक\fqa*\f* पापापासून आम्हाला शुद्ध करते. \p \v 8 जर आम्ही पापविरहित आहोत, असे आपण म्हणतो, तर आम्ही स्वतःला फसवितो आणि आमच्यामध्ये सत्य नाही. \v 9 जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील. \v 10 जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही. \c 2 \p \v 1 माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हासाठी हे लिहित आहे यासाठी की तुम्ही पाप करू नये, परंतु जर कोणी पाप करतो, तर आपल्यासाठी एक कैवारी येशू ख्रिस्त, जे नीतिमान आहेत आणि ते पित्याजवळ आहेत. \v 2 तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत. \s1 सहविश्वासणार्‍यांचे प्रेम आणि द्वेष \p \v 3 आपल्याला हे माहीत आहे की, जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तर आपल्याला त्यांची ओळख झाली आहे. \v 4 जो कोणी असे म्हणतो, “मी त्यांना ओळखतो,” परंतु त्यांच्या आज्ञांचे पालन करीत नाही तर तो लबाड आहे आणि सत्य त्या व्यक्तीमध्ये नाही. \v 5 परंतु जर कोणी त्यांचे वचन पाळतो, तर परमेश्वरासाठी त्याची प्रीती खरोखर त्यांच्यामध्ये पूर्ण झाली आहे. यावरून आपणास समजते की आपण त्यांच्यामध्ये आहोत. \v 6 जो कोणी असा दावा करतो की तो त्यांच्यामध्ये राहतो, त्याने जसे येशू राहिले तसे राहिले पाहिजे. \p \v 7 प्रिय बंधूंनो, मी काही तुम्हाला नवीन आज्ञा लिहून देत आहे असे नाही, तर ही जुनीच आहे, जी सुरुवातीपासून दिलेली आहे. ही जुनी आज्ञा जो एक संदेश आहे तो तुम्ही ऐकलेला आहे, \v 8 तरी मी तुम्हास एक नवी आज्ञा लिहित आहे; तिचे सत्य त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दिसून येत आहे, कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आताच प्रज्वलित झाला आहे. \p \v 9 जर कोणी प्रकाशामध्ये आहे असा दावा करतो, परंतु आपल्या बंधू किंवा भगिनीचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधकारातच आहे. \v 10 जो कोणी आपल्या बंधू आणि भगिनीवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये असे काहीच नाही की ज्यामुळे ते अडखळतील. \v 11 परंतु जर कोणी आपल्या बंधू व भगिनीचा द्वेष करतो, तो अंधकारात राहतो आणि अंधारात चालतो. ते कुठे जातात हे त्यांना कळत नाही, कारण अंधाराने त्यांना आंधळे केले आहे. \s1 लिहिण्याची कारणे \q1 \v 12 माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हाला लिहित आहे, \q2 कारण येशूंच्या नावामुळे तुमच्या पातकांची क्षमा झाली आहे. \q1 \v 13 पित्यांनो मी तुम्हाला लिहित आहे, \q2 कारण जे आरंभापासून आहेत त्यांना तुम्ही ओळखता. \q1 तरुणांनो, मी तुम्हाला लिहित आहे, \q2 कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे. \b \q1 \v 14 प्रिय मुलांनो मी तुम्हाला लिहितो, \q2 कारण तुम्ही पित्याला ओळखता. \q1 वडिलांनो मी तुम्हाला लिहितो, \q2 कारण तुम्ही त्यांना ओळखता जे सुरुवातीपासून आहेत. \q1 तरुणांनो मी तुम्हाला लिहितो, \q2 कारण तुम्ही सशक्त आहात \q2 आणि परमेश्वराचे वचन तुम्हामध्ये राहते, \q2 आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे. \s1 जगावर प्रेम करू नये यासाठी \p \v 15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतात तर त्यांच्यामध्ये पित्यासाठी प्रीती वसत नाही. \v 16 कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. \v 17 जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते. \s1 ख्रिस्तविरोधकापासून सावध राहणे \p \v 18 प्रिय मुलांनो, ही शेवटची घटका आहे; आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधक येत आहे आणि आतासुद्धा अनेक ख्रिस्तविरोधक आलेले आहेत. यावरूनच आपणास समजते की ही शेवटची घटका आहे. \v 19 ते आपल्यामधूनच बाहेर पडले आहेत, परंतु ते खरोखर आपले नव्हतेच. कारण ते जर आपल्यातील असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते; परंतु ते गेल्याने हे सिद्ध झाले की त्यांच्यापैकी कोणीही आपल्यातील नव्हता. \p \v 20 परंतु जे पवित्र ख्रिस्त येशू आहेत, त्यांच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. \v 21 तुम्हाला सत्य माहीत नाही म्हणून मी तुम्हास लिहितो असे नाही, परंतु ते तुम्हाला माहीत आहे आणि सत्याचा उगम असत्यापासून होत नाही. \v 22 लबाड कोण आहे? जो कोणी येशू हे ख्रिस्त आहे हे नाकारतो तो. असा मनुष्य ख्रिस्तविरोधक आहे, पिता आणि पुत्र यांना तो नाकारतो. \v 23 जो पुत्राला स्वीकारीत नाही त्याच्याजवळ पिता नाही; जो कोणी पुत्राला स्वीकारतो त्याच्याजवळ पितासुद्धा आहे. \p \v 24 तुम्ही तर हे लक्षात ठेवा की, तुम्ही जे काही सुरुवातीपासून ऐकले आहे ते तुम्हामध्ये राहते. ते जर तुम्हामध्ये राहते, तर तुम्ही सुद्धा पुत्र आणि पित्यामध्ये स्थिर राहाल. \v 25 त्यांनी आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे. \p \v 26 तुम्हाला भ्रमात पाडून बहकविण्याचा जे प्रयत्न करीत आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हास लिहित आहे. \v 27 प्रभूपासून जो अभिषेक तुम्हाला मिळाला आहे तो तुम्हावर राहतो; आणि तुम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही. त्यांचा अभिषेक तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवेल. त्यांचा अभिषेक खोटा नाही तर सत्य आहे, जसे त्यांनी तुम्हाला शिकविले आहे तसे त्यांच्यामध्ये राहा. \s1 परमेश्वराची मुले आणि पाप \p \v 28 आता प्रिय मुलांनो, सतत त्यांच्यामध्ये राहा, म्हणजे ते प्रकट होतील त्यावेळी आपण आत्मविश्वासपूर्वक असावे आणि त्यांच्या येण्याच्या दिवशी त्यांच्यासमोर आपणास लज्जित व्हावे लागणार नाही. \p \v 29 जर तुम्हाला माहीत आहे की ते नीतिमान आहेत, तर तुम्हाला हे माहीत आहे की, प्रत्येकजण जे काही चांगले करतात तो त्यांच्यापासून जन्मला आहे. \c 3 \p \v 1 पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही. \v 2 प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेत तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू. \v 3 ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत. \p \v 4 जे प्रत्येकजण पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हेच पाप आहे. \v 5 परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कोणतेही पाप नाही. \v 6 जे कोणी त्यांच्यामध्ये राहतात ते पाप करीत राहत नाही. जे कोणी पाप करीत राहतात, त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेले नाही किंवा त्यांना ओळखले नाही. \p \v 7 अहो प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी बहकवू नये. जसे ख्रिस्त नीतिमान आहेत, तसेच जे कोणी योग्य ते करतात ते नीतिमान आहेत. \v 8 जो कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले. \v 9 ज्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे, ते पाप करीत राहत नाही, कारण त्यांच्याठायी परमेश्वराचे बीज राहते; म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते, कारण त्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे. \v 10 यावरून आपल्याला परमेश्वराची मुले कोणती आणि सैतानाची मुले कोणती, हे ओळखता येते. जे कोणी जे योग्य आहे ते करीत नाहीत, ती परमेश्वराची लेकरे नाहीत किंवा जे कोणी आपल्या भावावर आणि बहिणीवर प्रीती करीत नाही ते सुद्धा परमेश्वरापासून नाहीत. \s1 प्रीती आणि द्वेष \p \v 11 कारण आपण एकमेकांवर प्रीती करावी हाच संदेश तुम्ही सुरुवातीपासून ऐकला आहे. \v 12 आपण काईनासारखे होऊ नये, कारण तो सैतानाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला. त्याने त्याचा वध का केला? कारण काईनाची कृत्ये वाईट होत्या आणि त्याच्या भावाची कृत्ये नीतियुक्त होती. \v 13 म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो जगाने तुमचा द्वेष केला, तर आश्चर्य करू नका. \v 14 आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत कारण आपण एकमेकांवर प्रीती करतो. जे कोणी प्रीती करीत नाही ते मरणामध्येच राहतात. \v 15 जे कोणी भावाचा आणि बहिणीचा द्वेष करतात ते खुनी आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की, कोणत्याही खुनी व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवन राहत नाही. \p \v 16 प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे. \v 17 जर कोणाजवळ ऐहिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल? \v 18 प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी. \p \v 19 यावरून आपल्याला माहीत होते की, आपण सत्याच्या पक्षाचे आहोत आणि त्याच्या समक्षतेत आपली हृदये विसावतात. \v 20 जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत असतील तर हे लक्षात ठेवा की, परमेश्वर आपल्या अंतःकरणापेक्षा महान आहेत आणि ते सर्वकाही जाणतात. \v 21 प्रिय मित्रांनो, जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत नसतील तर परमेश्वरासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे \v 22 आणि आपण जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळते, कारण आपण त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडणार्‍या गोष्टी करतो. \v 23 ही त्यांची आज्ञा आहेः त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणे आणि त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी. \v 24 जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. आणि अशा रीतीने आपल्याला समजते की परमेश्वर आपल्यामध्ये राहतात: परमेश्वराने जो आत्मा आपणास दिला आहे त्याद्वारे हे आपणास समजून येते. \c 4 \s1 आत्म्यांची परीक्षा करा \p \v 1 प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत. \v 2 याप्रकारे तुम्ही परमेश्वराचा आत्मा ओळखू शकता: जो प्रत्येक आत्मा, येशू ख्रिस्त देह धारण करून आले होते हे स्वीकारतो, तो परमेश्वरापासून आहे. \v 3 परंतु प्रत्येक आत्मा जो येशूंचा अंगीकार करीत नाही तो परमेश्वरापासून नाही. हा तर ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे, ज्याच्या येण्याबद्दल तुम्ही ऐकले आहे आणि तो आधीच जगामध्ये आलेला आहे. \p \v 4 प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही विजय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा जे तुम्हामध्ये आहेत, ते श्रेष्ठ आहेत. \v 5 हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते. \v 6 आम्ही परमेश्वरापासून आहोत आणि जे परमेश्वराला ओळखतात ते आमचे ऐकतात; परंतु जे कोणी परमेश्वरापासून नाहीत ते आमचे ऐकत नाहीत. याद्वारेच आम्ही सत्याचा आत्मा कोणता आणि फसवणुकीचा आत्मा कोणता हे ओळखतो. \s1 परमेश्वराची प्रीती व आपली प्रीती \p \v 7 प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहेत आणि ते परमेश्वराला ओळखतात. \v 8 परंतु जे प्रीती करीत नाहीत, ते परमेश्वराला ओळखत नाहीत, कारण परमेश्वर प्रीती आहेत. \v 9 परमेश्वराने आपल्यावरील प्रीती अशी प्रकट केलीः त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठविले यासाठी की, आपल्याला त्यांच्याद्वारे जीवन लाभावे. \v 10 प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले. \v 11 प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याअर्थी आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. \v 12 परमेश्वराला कोणीही कधीही पाहिले नाही; परंतु जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर, परमेश्वर आपल्यामध्ये राहतात आणि त्यांची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण झाली आहे. \p \v 13 ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा हा आहेः त्यांनी स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे. \v 14 आम्ही पाहिले आहे आणि अशी साक्ष देतो की, पित्याने त्यांच्या पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. \v 15 येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकृत करतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात आणि ते परमेश्वरामध्ये राहतात. \v 16 परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. \p परमेश्वर प्रीती आहेत. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. \v 17 अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते, यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला असा आत्मविश्वास प्राप्त व्हावाः या जगात आपण येशू सारखे आहोत. \v 18 प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो. \p \v 19 आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो, कारण त्यांनी प्रथम आम्हावर प्रीती केली. \v 20 जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात, तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनही त्यांच्यावर प्रीती करीत नाही, तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाहीत, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही. \v 21 परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिली आहेः जे कोणी परमेश्वरावर प्रीती करतात त्यांनी आपल्या भावावर आणि बहिणीवर सुद्धा प्रीती करावी. \c 5 \s1 परमेश्वराच्या पुत्रावरील विश्वास \p \v 1 येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरही प्रीती करतात. \v 2 आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रीती करतो हे यावरून आपणास समजतेः परमेश्वरावर प्रीती करावी व त्यांच्या आज्ञांचे पालन करावे. \v 3 परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत \v 4 कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे. \v 5 जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात. \p \v 6 पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. \v 7 याबद्दल तिघे जण साक्ष देतात: \v 8 आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये\f + \fr 5:8 \fr*\ft काही आधुनिक प्रतींनुसार \ft*\fqa स्वर्गामध्ये पिता, शब्द आणि पवित्र आत्मा साक्ष देतात, आणि ते तिघे एक आहेत\fqa*\f* एकमत आहे. \v 9 आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो, परंतु परमेश्वराची साक्ष सर्वात महान आहे, कारण ती परमेश्वराने दिलेली साक्ष आहे जी त्यांनी त्यांच्या पुत्राबद्दल दिली आहे. \v 10 जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही; \v 11 हीच ती साक्ष आहे: परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्यांच्या पुत्रामध्ये आहे. \v 12 ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही. \s1 समाप्तीचे अभिप्राय \p \v 13 मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, तुम्ही जे परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळालेले आहे. \v 14 आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात. \v 15 जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे. \p \v 16 ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. \v 17 प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही. \p \v 18 आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही. \v 19 आपल्याला हे माहीत आहे की, आपण परमेश्वराची लेकरे आहोत आणि संपूर्ण जग त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. \v 20 आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की, परमेश्वराचे पुत्र ख्रिस्त आले आहेत आणि आपण खर्‍या परमेश्वराला ओळखावे यासाठी त्यांनी आपल्याला बुद्धी दिली आहे. त्यांचे पुत्र येशू ख्रिस्तामध्ये असल्याने, जे खरे आहेत त्यांच्यामध्ये आपण आहोत. तेच एकमेव खरे परमेश्वर आहेत आणि तेच सार्वकालिक जीवन आहेत. \b \b \p \v 21 प्रिय लेकरांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर ठेवा.