\id 1CH - Biblica® Open Marathi Contemporary Version \usfm 3.0 \ide UTF-8 \h 1 इतिहास \toc1 1 इतिहास \toc2 1 इतिहास \toc3 1 इति \mt1 1 इतिहास \c 1 \s1 आदामापासून अब्राहामापर्यंतची ऐतिहासिक नोंदी \s2 नोआहच्या पुत्रांपर्यंत \li1 \v 1 आदाम, शेथ, अनोश, \li1 \v 2 केनान, महलालेल, यारेद, \li1 \v 3 हनोख, मथुशेलह, लामेख, \li1 नोआह. \b \lf \v 4 नोआहाचे पुत्र: शेम, हाम व याफेथ. \s2 याफेथाचा वंश \li1 \v 5 याफेथाचे पुत्र: \li2 गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास. \li1 \v 6 गोमेरचे पुत्र: \li2 आष्कनाज, रीपाथ\f + \fr 1:6 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa दीपाथ\fqa*\f* व तोगर्माह. \li1 \v 7 यावानाचे पुत्र: \li2 एलिशाह, तार्शीश, कित्तीम व रोदानीम.\f + \fr 1:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa दोदानीम\fqa*\f* \s2 हामाचा वंश \li1 \v 8 हामाचे पुत्र: \li2 कूश, इजिप्त, पूट व कनान. \li1 \v 9 कूशाचे पुत्र: \li2 सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. \li1 रामाहचे पुत्र: \li2 शबा व ददान. \li1 \v 10 कूश निम्रोदचा पिता होता, \li2 जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला. \li1 \v 11 इजिप्तचे पुत्र: \li2 लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, \v 12 पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम. \li1 \v 13 कनान यांचा पिता होता: \li2 प्रथमपुत्र सीदोन, आणि हेथ, \v 14 यबूसी, अमोरी, गिर्गाशी, \v 15 हिव्वी, आर्की, सीनी, \v 16 अर्वादी, समारी व हमाथी. \s2 शेमचे वंश \li1 \v 17 शेमचे पुत्र: \li2 एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम. \li1 अरामाचे पुत्र: \li2 ऊस, हूल, गेतेर व मेशेख. \li1 \v 18 अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला, \li2 व शेलाह एबरचा पिता झाला. \li1 \v 19 एबरला दोन पुत्र झाले: \li2 एकाचे नाव पेलेग\f + \fr 1:19 \fr*\fq पेलेग \fq*\ft म्हणजे \ft*\fqa विभागणी\fqa*\f* ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते. \li1 \v 20 योक्तानचे पुत्र: \li2 अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, \v 21 हदोराम, ऊजाल, दिक्लाह, \v 22 ओबाल\f + \fr 1:22 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa एबाल\fqa*\f*, अबीमाएल, शबा, \v 23 ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते. \b \li1 \v 24 शेम, अर्पक्षद, शेलाह, \li1 \v 25 एबर, पेलेग, रऊ, \li1 \v 26 सरूग, नाहोर, तेरह, \li1 \v 27 व अब्राम (अर्थात् अब्राहाम). \s1 अब्राहामाचे कुटुंब \lh \v 28 अब्राहामाचे पुत्र: इसहाक व इश्माएल. \s2 हागारचे वंशज \li1 \v 29 हे त्यांचे वंशज होते: \li2 इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम, \v 30 मिश्मा, दूमाह, मस्सा, हदद, तेमा, \v 31 यतूर, नापीश आणि केदमाह. \lf हे इश्माएलचे पुत्र होते. \s2 केटूराहचे वंशज \li1 \v 32 अब्राहामाची उपपत्नी केटूराह हिला जन्मलेले पुत्र: \li2 जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह. \li1 योक्षानचे पुत्र: \li2 शबा आणि ददान. \li1 \v 33 मिद्यानाचे पुत्र: \li2 एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह. \lf हे सर्व केटूराहचे वंशज होते. \s2 साराहचे वंशज \lh \v 34 अब्राहामास इसहाक झाला. \li1 इसहाकाचे पुत्र: \li2 एसाव व इस्राएल. \s1 एसावाचे पुत्र \li1 \v 35 एसावाचे पुत्र: \li2 एलीफाज, रऊएल, यऊश, यालाम व कोरह. \li1 \v 36 एलीफाजचे पुत्र: \li2 तेमान, ओमर, सेपो,\f + \fr 1:36 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa सेपो\fqa*\f* गाताम व केनाज, \li2 तिम्नाद्वारे: अमालेक. \li1 \v 37 रऊएलाचे पुत्र: \li2 नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. \s2 एदोम मधील सेईराचे लोक \li1 \v 38 सेईराचे पुत्र: \li2 लोटान, शोबाल, सिबोन, अनाह, दिशोन, एसर व दीशान. \li1 \v 39 लोटानाचे पुत्र: \li2 होरी व होमाम. तिम्ना लोटानाची बहीण होती. \li1 \v 40 शोबालाचे पुत्र: \li2 अलवान, मानहथ, एबाल, शेफी व ओनाम. \li1 सिबोनाचे पुत्र: \li2 अय्याह व अनाह. \li1 \v 41 अनाहचा पुत्र: \li2 दिशोन. \li1 दिशोनाचे पुत्र: \li2 हेमदान\f + \fr 1:41 \fr*\ft काही हस्तलिखाणात \ft*\fqa हम्रान\fqa*\f*, एश्बान, इथरान व करान. \li1 \v 42 एसराचे पुत्र: \li2 बिल्हान, जावान व याकान\f + \fr 1:42 \fr*\fq याकान \fq*\ft किंवा \ft*\fqa आकान\fqa*\f*. \li1 दिशोनाचे पुत्र: \li2 ऊस व अरान. \s2 एदोमाचे शासक \lh \v 43 इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: \li1 बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते. \li1 \v 44 बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 45 योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 46 हुशामच्या मृत्यूनंतर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला; यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते. \li1 \v 47 मग हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 48 सामलाहच्या मृत्यूनंतर फरात\f + \fr 1:48 \fr*\fq फरात \fq*\ft किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते\ft*\f* नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातला शौल त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 49 शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला. \li1 \v 50 बआल-हानानच्या मृत्यूनंतर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ\f + \fr 1:50 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa पाई\fqa*\f* होते आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेदची कन्या होती. \v 51 हदादही मरण पावला. \b \lh एदोमाचे मूळ पुरुष: \li1 तिम्ना, आल्वा, यतेथ, \v 52 ओहोलीबामाह, एलाह, पीनोन, \v 53 केनाज, तेमान, मिब्सार, \v 54 मग्दीएल व ईराम. \lf हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी होते. \c 2 \s1 इस्राएलचे पुत्र \lh \v 1 इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून, \v 2 दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर. \s1 यहूदा \s2 हेस्रोनाचे पुत्र \li1 \v 3 यहूदाहचे पुत्र: \li2 एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा\f + \fr 2:3 \fr*\fq बथ-शूवा \fq*\ft अर्थात् \ft*\fqa शूआची मुलगी\fqa*\f* हिच्या पोटी त्यास झाले. \li2 (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.) \li2 \v 4 यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले; \lf यहूदाहास एकंदर पाच पुत्र झाले. \b \li1 \v 5 पेरेसाचे पुत्र: \li2 हेस्रोन व हामूल. \li1 \v 6 जेरहाचे पुत्र: \li2 जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा\f + \fr 2:6 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa दारदा\fqa*\f*; असे एकंदर पाच पुत्र होते. \li1 \v 7 कर्मीचा पुत्र: \li2 आखार\f + \fr 2:7 \fr*\fq आखार \fq*\ft अर्थात् \ft*\fqa त्रास \fqa*\ft यहोशुआमध्ये \ft*\fqa आखान\fqa*\f*, ज्याने अविश्वासूपणे मूर्तीस समर्पित वस्तूंची चोरी करून आपल्या इस्राएली राष्ट्रास क्लेश दिला. \li1 \v 8 एथानाचा पुत्र: \li2 अजर्‍याह. \li1 \v 9 हेस्रोनास झालेले पुत्र: \li2 यरहमेल, राम व केलूबाइ.\f + \fr 2:9 \fr*\ft किंवा \ft*\fqa कालेब\fqa*\f* \s2 हेस्रोनचा पुत्र राम पासून \li1 \v 10 रामास अम्मीनादाब झाला, \li1 आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला. \li1 \v 11 नहशोनाला सल्मा\f + \fr 2:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa सल्मोन\fqa*\f* \li1 व सल्माला बवाज हा झाला; \li1 \v 12 बवाजाला ओबेद झाला \li1 व ओबेदाला इशाय झाला. \b \li1 \v 13 इशायाचे पुत्र: \li2 ज्येष्ठपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब, \li2 तिसरा शिमिआ, \v 14 चवथा नथानेल, \li2 पाचवा रद्दाय, \v 15 सहावा ओसेम, \li2 व सातवा दावीद हे होते. \li2 \v 16 त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. \li3 जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते. \li3 \v 17 अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता. \s2 हेस्रोनचा पुत्र कालेब \li1 \v 18 हेस्रोनचा पुत्र कालेबास त्याच्या पत्नी अजूबा (व यरियोथ) यांच्यापासून संतती झाली. अजुबाहचे पुत्र: \li2 येशेर, शोबाब व अर्दोन. \li1 \v 19 अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला. \li2 \v 20 हूरास उरी झाला व उरीस बसालेल झाला. \b \li1 \v 21 नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला. \li2 \v 22 सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले. \li2 \v 23 (पण गशूर व अराम यांनी हव्योथ याईर व केनाथ आणि त्यांच्या आसपासची गावे अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली.) \lf गिलआदाचा पिता माखीरची ही संतती होय. \li1 \v 24 हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता\f + \fr 2:24 \fr*\fq पिता \fq*\ft किंवा \ft*\fqa सेनानायक\fqa*\f* अश्हूर हा झाला. \s2 हेस्रोनाचा ज्येष्ठपुत्र यरहमेल \li1 \v 25 हेस्रोनाचा\f + \fr 2:25 \fr*\ft किंवा \ft*\fqa ओरेन\fqa*\f* ज्येष्ठपुत्र यरहमेल याचे पुत्र: \li2 ज्येष्ठपुत्र राम, बुना, ओरेन ओसेम व अहीयाह. \v 26 यरहमेलाची अटाराह नावाची दुसरी एक पत्नी होती. ती ओनामची आई होती. \li1 \v 27 यरहमेलाचा ज्येष्ठपुत्र रामचे पुत्र: \li2 मास, यामीन व एकर. \li1 \v 28 ओनामाचे पुत्र: \li2 शम्मय व यादा. \li1 शम्मयाचे पुत्र: \li2 नादाब व अबीशूर. \v 29 अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल होते. तिच्या पोटी त्यास अहबान व मोलीद हे झाले. \li1 \v 30 नादाबाचे पुत्र: \li2 सलेद व अप्पईम. सलेद हा पुत्रहीन मेला. \li1 \v 31 अप्पईमचा पुत्र: \li2 इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला. \li1 \v 32 शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र: \li2 येथेर व योनाथान. येथेर हा पुत्रहीन मेला. \li1 \v 33 योनाथानचे पुत्र: \li2 पेलेथ व जाजा. \lf ही यरहमेलाची संतती होती. \b \li1 \v 34 शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. \li2 त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता. \v 35 शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला. \li1 \v 36 अत्तायास नाथान, \li1 नाथानास जाबाद, \li1 \v 37 जाबादास एफलाल, \li1 एफलालास ओबेद, \li1 \v 38 ओबेदास येहू, \li1 येहूस अजर्‍याह, \li1 \v 39 अजर्‍याहास हेलेस, \li1 हेलेसाला एलीयासाह, \li1 \v 40 एलीयासाहला सिस्माय, \li1 सिस्मायास शल्लूम, \li1 \v 41 शल्लूमास यकम्याह, \li1 आणि यकम्याहास एलीशामा झाला. \s2 कालेबाचे कूळ \li1 \v 42 यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: \li2 ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, \li2 मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता. \li1 \v 43 हेब्रोनाचे पुत्र: \li2 कोरह, तप्पूआह, रेकेम व शमा. \li1 \v 44 शमास रहम झाला. \li2 तो यर्कामाचा पिता होता. \li1 रेकेमास शम्मय हा झाला. \li1 \v 45 शम्मयाचा पुत्र मावोन, \li2 माओन हा बेथ-सूराचा पिता होता. \li1 \v 46 कालेबाची उपपत्नी एफाहला \li2 हारान, मोसा व गाजेज झाले. \li2 हारानास गाजेज झाला. \li1 \v 47 यादायाचे पुत्र: \li2 रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफाह व शाफ. \li1 \v 48 कालेबाची उपपत्नी माकाहला \li2 शेबेर व तिर्‍हना हे झाले. \li2 \v 49 याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ, \li2 आणि मखबेना व गिबियाह यांचा पिता शेवा हे झाले; \li1 कालेबाची कन्या अक्साह होती. \lf \v 50 ही कालेबाची संतती होय. \b \li1 एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र: \li2 शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता. \v 51 सल्मा बेथलेहेमाचा पिता होता. हारेफ हा बेथ-गादेराचा पिता होता. \li1 \v 52 किर्याथ-यआरीमाच्या पिता शोबालचे वंशज: \li2 हारोवेह व अर्धे मेनुहोथवासी. \v 53 किर्याथ-यआरीम याची कुळे: इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई. यांच्यापासून सोराथी व एष्टाबुली ही कुळे निघाली. \li1 \v 54 सल्माचे वंशज: \li2 बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-योआब आणि अर्धे मानाहथी, सोरी, \v 55 आणि याबेस येथे राहणारी सोफारी\f + \fr 2:55 \fr*\ft किंवा \ft*\fqa लेखनिकांची\fqa*\f* कुळे: तिराथी, शिमाथी व सुकाथी. रेखाब\f + \fr 2:55 \fr*\ft किंवा \ft*\fqa बेथ-रेकाबचा पिता\fqa*\f* घराण्याचा मूळ पुरुष हम्मथच्या वंशातील ही केनी कुळे होती. \c 3 \s2 दावीदाचे पुत्र \lh \v 1 हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे पुत्र: \b \li1 दावीदाचा ज्येष्ठपुत्र अम्नोन. दावीदाला तो येज्रीली अहीनोअमपासून झाला. \li1 दावीदाचा दुसरा पुत्र दानीएल. त्याच्या आईचे नाव अबीगईल असे असून ती कर्मेलची होती. \li1 \v 2 तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. \li1 चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला. \li1 \v 3 पाचवा पुत्र शफाट्याह अबीटालपासून झाला. \li1 सहावा पुत्र इथ्रियामची पत्नी एग्लाहपासून झाला. \b \lf \v 4 हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले. \b \b \lh यरुशलेममध्ये दावीदाने तेहतीस वर्षे राज्य केले. \v 5 यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे: \b \li1 शम्मुआ\f + \fr 3:5 \fr*\ft किंवा \ft*\fqa शिमिआ\fqa*\f*, शोबाब, नाथान, शलोमोन हे चार अम्मीएलाची कन्या बथशेबा\f + \fr 3:5 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa बथ-शूवा\fqa*\f* हिच्यापासून झाले. \li1 \v 6 नंतर इभार, एलीशुआ,\f + \fr 3:6 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa एलीशामा\fqa*\f* एलिफेलेत. \v 7 नोगा, नेफेग, याफीय, \v 8 एलीशामा, एलयादा व एलिफेलेत हे सुद्धा झाले; असे एकूण नऊ पुत्र होते. \b \lf \v 9 या यादीमध्ये त्याला त्याच्या उपपत्नींपासून झालेल्या पुत्रांचा समावेश केलेला नाही. दावीदाला तामार नावाची एक कन्याही होती. \s2 यहूदीयाचे राजे \li1 \v 10 शलोमोनचा पुत्र रेहोबोअम, \li1 त्याचा पुत्र अबीयाह, \li1 त्याचा पुत्र आसा, \li1 त्याचा पुत्र यहोशाफाट, \li1 \v 11 त्याचा पुत्र यहोराम\f + \fr 3:11 \fr*\fq यहोराम \fq*\ft किंवा \ft*\fqa योराम\fqa*\f*, \li1 त्याचा पुत्र अहज्याह, \li1 त्याचा पुत्र योआश, \li1 \v 12 त्याचा पुत्र अमस्याह, \li1 त्याचा पुत्र अजर्‍याह, \li1 त्याचा पुत्र योथाम, \li1 \v 13 त्याचा पुत्र आहाज, \li1 त्याचा पुत्र हिज्कीयाह, \li1 त्याचा पुत्र मनश्शेह, \li1 \v 14 त्याचा पुत्र आमोन, \li1 त्याचा पुत्र योशीयाह. \li1 \v 15 योशीयाहचे पुत्र: \li2 ज्येष्ठ योहानान, \li2 दुसरा यहोयाकीम, \li2 तिसरा सिद्कीयाह, \li2 व चौथा शल्लूम. \li1 \v 16 यहोयाकीमाचे पुत्र: \li2 यकोन्याह\f + \fr 3:16 \fr*\ft किंवा \ft*\fqa यहोयाखीन\fqa*\f*, \li2 व सिद्कीयाह. \s2 बंदिवासात गेल्यानंतरचे राजघराणे \li1 \v 17 बंदी झालेले यकोन्याहचे पुत्र: \li2 शल्तीएल, \v 18 मल्कीराम, पदायाह, शेनस्सर, यकम्याह, होशामा व नेदब्याह. \li1 \v 19 पदायाहचे पुत्र: \li2 जरूब्बाबेल व शिमी. \li1 जरूब्बाबेलाचे पुत्र: \li2 मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ. \v 20 त्या शिवाय आणखी पाच पुत्र होते: हशूबाह, ओहेल, बेरेख्याह, हसद्याह व यूशाब-हेसेद. \li1 \v 21 हनन्याहचे पुत्र: \li2 पेलतियाह व यशायाह. यशायाहचा पुत्र रफायाह. रफायाहचा पुत्र नाव अर्णान. अर्णानला ओबद्याह हा झाला. ओबद्याहचा पुत्र शखन्याह. \li1 \v 22 शखन्याहचे वंशज: \li2 शमायाह आणि त्याचे पुत्र: हट्टूश, इगाल, बारीहा, निरय्याह व शाफाट; एकूण सहा पुत्र. \li1 \v 23 निरय्याहचे पुत्र: \li2 एलिओएनाइ, हिज्कीयाह व अज्रीकाम, एकूण तीन पुत्र. \li1 \v 24 एलिओएनाइ याचे पुत्र: \li2 होदव्याह, एल्याशीब, पेलतियाह, अक्कूब, योहानान, दलायाह व अनानी; एकूण सात पुत्र. \c 4 \s2 यहूदाहची इतर कुळे \li1 \v 1 यहूदाहचे वंशज: \li2 पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल. \li1 \v 2 शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत. \li1 \v 3 एटामाचे पुत्र: \li2 येज्रील, इश्मा, इद्बाश व त्यांची बहीण हस्सलेलपोनी होती. \v 4 पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला. \li1 हूरचे वंशज: ज्येष्ठपुत्र एफ्राथाह आणि तो बेथलेहेमाचा पिता होता. \li1 \v 5 तकोवाचा पिता अश्हूरला हेला व नाराह अशा दोन पत्नी होत्या. \li1 \v 6 नाराहच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमानी व अहष्टारी झाले. ही नाराहची संतती होती. \li1 \v 7 हेलाचे पुत्र: \li2 सेरथ, जोहर व एथ्नान \v 8 व कोस, जो आनूब व हस्सोबेबाह यांचा पिता होता, तसेच त्याच्यापासून हारूमाचा पुत्र अहरहेल याची कुळे निपजली. \b \p \v 9 याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक आदरणीय होता; “त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले” असे म्हणत त्याच्या आईने त्याचे नाव याबेस\f + \fr 4:9 \fr*\fq याबेस \fq*\ft अर्थात् \ft*\fqa क्लेश\fqa*\f* ठेवले. \v 10 याबेसाने इस्राएलाच्या परमेश्वराजवळ प्रार्थना केली, “तुम्ही मला आशीर्वादित करा, माझ्या क्षेत्राचा विस्तार करा! माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन, मला क्लेश वाटू नये म्हणून तुमचा हात माझ्यावर राहो.” परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली. \b \li1 \v 11 शूहाहचा भाऊ कलूबला महीर झाला; हा एष्टोनाचा पिता होता. \v 12 एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश\f + \fr 4:12 \fr*\ft किंवा \ft*\fqa नाहाशचे शहर\fqa*\f* चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते. \b \li1 \v 13 केनाजचे पुत्र: \li2 ओथनिएल व सेरायाह. \li1 ओथनिएलाचे पुत्र: \li2 हथथ आणि मेयोनोथाय. \v 14 मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. \li1 सेरायाह योआबाचा पिता होता, \li2 हा योआब गे-हाराशीम\f + \fr 4:14 \fr*\fq गे-हाराशीम \fq*\ft अर्थात् \ft*\fqa निपुण कारागिरांची दरी\fqa*\f* चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते. \li1 \v 15 यफुन्नेहचा पुत्र कालेबाचे पुत्र: \li2 इरु, एलाह व नाआम. \li1 एलाहचा पुत्र: \li2 केनाज. \li1 \v 16 यहल्लेलेलचे पुत्र: \li2 जीफ, जीफा, तिर्‍या व असरेल. \li1 \v 17 एज्राहचे पुत्र: \li2 येथेर, मेरेद, एफेर व यालोन. \li1 मेरेदची एक पत्नी बिथ्याने मिर्याम, शम्मय व इश्बह यास जन्म दिला. इश्बह एष्टमोवाचा पिता होता. \v 18 मेरेदने इजिप्तचा राजा फारोहची राजकन्या बिथ्याशी विवाह केला होता. \li1 यहूदाह गोत्रातील त्याच्या पत्नीने गदोरचा पिता येरेद, सोकोहचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथिएल यांना जन्म दिला. \li1 \v 19 नहमाची बहीण, होदीयाहची पत्नी झाली; तिला: \li2 गार्मी येथील कईलाहचा पिता व माकाथी येथील एष्टमोवा झाले. \li1 \v 20 शिमओनाचे पुत्र: \li2 अम्नोन, रिन्नाह, बेन-हानान व तिलोन. \li1 इशीचे वंशज: \li2 जोहेथ व बेन-जोहेथ. \li1 \v 21 यहूदाहचा पुत्र शेलाहचे पुत्र: \li2 लेकाहचा पिता एर, मारेशाहचा पिता लादाह आणि बेथ-अश्बे येथील तलम कापडाचे विणकाम करणारी कुळे उत्पन्न झाली. \li2 \v 22 तसेच शेलापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योआश, मोआबावर सत्ता चालविणारे साराफ व यशूबी-लेहेम हे निपजले. (हा वृतांत प्राचीन नोंदवहीतील आहे.) \v 23 हे कुंभार असून नताईम व गेदेराह येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याजवळ राहत असत. \s1 शिमओन \li1 \v 24 शिमओनाचे वंशज: \li2 नेमूएल, यामीन, यारीब, जेरह व शौल; \li2 \v 25 शौलाचा पुत्र शल्लूम, शल्लूमाचा पुत्र मिबसाम आणि मिबसामचा पुत्र मिश्मा. \li1 \v 26 मिश्माचा वंशज: \li2 त्याचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलाचा पुत्र जक्कूरचा पुत्र शिमी. \b \p \v 27 शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाहच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही. \v 28 त्यांनी वस्ती केलेली गावे ही: बेअर-शेबा, मोलादाह, हसर-शुआल, \v 29 बिल्हा असेम, तोलाद, \v 30 बेथुएल, होरमाह सिकलाग, \v 31 बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती. \v 32 त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि \v 33 या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत\f + \fr 4:33 \fr*\ft काही मूळ प्रतींनुसार \ft*\fqa बालाथ\fqa*\f* वस्ती करून होते. \b \lh त्यांच्या वंशावळीत असे नमूद केलेले आहे: \b \li1 \v 34 मेशोबाब, यामलेख, \li1 अमस्याहाचा पुत्र योशाह, \v 35 योएल. \li1 येहू योशिब्याहचा पुत्र, जो सेरायाहचा पुत्र, जो असिएलाचा पुत्र होता. \li1 \v 36 एलिओएनाइ, याकोबाह, यहोशायाह, \li1 असायाह, अदिएल, यशीमिएल, बेनाइयाह. \li1 \v 37 जीजा हा शिफीचा पुत्र, जो अल्लोनचा पुत्र, जो यदायाहचा पुत्र, जो शिम्रीचा पुत्र व जो शमायाहचा पुत्र होता. \b \lf \v 38 नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. \b \p या कुटुंबांचा खूप विस्तार झाला. \v 39 ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्‍यापर्यंत गेले. \v 40 तिथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला. तो देश विस्तीर्ण असून शांत व निवांत होता; तिथे पूर्वी हामाचे वंशज राहत असत. \p \v 41 ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्‍यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता. \v 42 त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले. \v 43 तिथे जे पळून गेलेले अमालेकी उरले होते, त्यांचा संहार करून ते आजवर तिथे राहतात. \c 5 \s1 रऊबेन \lh \v 1 रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही. \v 2 जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला. \v 3 इस्राएलचा ज्येष्ठपुत्र रऊबेनचे पुत्र: \b \li2 हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. \li1 \v 4 योएलाचे वंशज: \li2 त्याचा पुत्र शमायाह, त्याचा पुत्र गोग, \li2 त्याचा पुत्र शिमी, \v 5 शिमीचा पुत्र मीखाह, \li2 त्याचा पुत्र रेआयाह, त्याचा पुत्र बाल, \li2 \v 6 बालाचा पुत्र बैरा रऊबेन वंशाचा सरदार असून त्याला अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर\f + \fr 5:6 \fr*\fq तिग्लथ-पिलेसर \fq*\ft याला \ft*\fqa तिग्लथ-पिल्नेसर \fqa*\ft म्हणूनही ओळखले जाते\ft*\f* ने कैद करून नेले. \li1 \v 7 त्याच्या भावांची वंशावळी त्यांच्या कुळांप्रमाणे लिहिली ती अशी: \li2 प्रमुख ईयेल, जखर्‍याह, \v 8 बेलाचा पिता आजाजचा पिता शमा व त्याचा पिता योएल. \b \p हा वंश नबो व बआल-मेओन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला. \v 9 पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते. \p \v 10 शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्‍यात ते वस्ती करू लागले. \s1 गाद \lh \v 11 गादाचे वंशज त्यांच्यासमोर सलेकाह येथवर बाशान प्रदेशात राहत होते: \b \li1 \v 12 त्यात योएल प्रमुख होता व दुसरा शाफाम, याखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते. \li1 \v 13 त्यांच्या पितृकुळाप्रमाणे त्यांचे बांधव: \li2 मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर; असे सर्व मिळून सात. \li2 \v 14 अबीहाईल हूरीचा पुत्र, जो दूरीचा पुत्र, जो यारोहचा पुत्र, जो गिलआदाचा पुत्र, जो मिखाएलचा पुत्र, जो यशीशायचा पुत्र, जो यहदोचा पुत्र, जो बूजचा पुत्र. \li2 \v 15 अही जो अबदीएलचा पुत्र, जो गूनीचा पुत्र हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख होता. \b \p \v 16 गादचे लोक गिलआदात व बाशानात व तेथील गावात आणि शारोनच्या शिवारात आपल्या सीमेत वस्ती करून राहिले. \p \v 17 या सर्वांची वंशावळी यहूदीयाचा राजा योथाम व इस्राएलचा राजा यरोबोअम यांच्या कारकिर्दीत संग्रहित करण्यात आली होती. \b \p \v 18 रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे. \v 19 त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले. \v 20 त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली. \v 21 त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले. \v 22 बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले. \s1 मनश्शेहचा अर्धा वंश \p \v 23 मनश्शेहच्या अर्ध्या वंशातील लोक असंख्य होते. त्यांनी बाशानपासून बआल-हर्मोन, सनीरपर्यंत (हर्मोन पर्वत) वस्ती केली. \p \v 24 त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पुरुष: एफेर, इशी, एलीएल, अज्रीएल, यिर्मयाह, होदव्याह व यहदीएल. हे महावीर व नामांकित पुरुष असू कुलप्रमुख होते. \v 25 ते आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराशी अविश्वासू झाले आणि परमेश्वराने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता, त्यांच्या दैवतांच्या नादी लागून ते व्यभिचारी बनले. \v 26 यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत. \c 6 \s1 लेवी \li1 \v 1 लेवीचे पुत्र: \li2 गेर्षोन, कोहाथ व मरारी. \li1 \v 2 कोहाथाचे पुत्र: \li2 अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. \li1 \v 3 अम्रामाची संतती: \li2 अहरोन, मोशे व मिर्याम. \li1 अहरोनाचे पुत्र: \li2 नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार. \li2 \v 4 एलअज़ारास फिनहास, \li2 फिनहासास अबीशूवा, \li2 \v 5 अबीशूवास बुक्की, \li2 बुक्कीस उज्जी, \li2 \v 6 उज्जीस जरह्याह, \li2 जरह्याहास मरायोथ, \li2 \v 7 मरायोथास अमर्‍याह, \li2 अमर्‍याहास अहीतूब, \li2 \v 8 अहीतूबास सादोक, \li2 सादोकास अहीमाज, \li2 \v 9 अहीमाजास अजर्‍याह, \li2 अजर्‍याहास योहानान, \li2 \v 10 योहानान यास अजर्‍याह झाला. \li2 अजर्‍याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे. \li2 \v 11 अजर्‍याहास अमर्‍याह, \li2 अमर्‍याहास अहीतूब झाला, \li2 \v 12 अहीतूबास सादोक, \li2 सादोकास शल्लूम, \li2 \v 13 शल्लूमास हिल्कियाह, \li2 हिल्कियाहास अजर्‍याह, \li2 \v 14 अजर्‍याहास सरायाह, \li2 सेरायाहास यहोसादाक\f + \fr 6:14 \fr*\fq यहोसादाक \fq*\ft दुसरे नाव \ft*\fqa योसादक\fqa*\f* झाला. \li2 \v 15 याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला. \b \li1 \v 16 लेवीचे पुत्र: \li2 गेर्षोन,\f + \fr 6:16 \fr*\ft गेर्षोम\ft*\f* कोहाथ व मरारी. \li1 \v 17 ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे: \li2 लिब्नी व शिमी. \li1 \v 18 कोहाथाचे पुत्र: \li2 अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. \li1 \v 19 मरारीचे पुत्र: \li2 महली व मूशी. \b \lh त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे: \li1 \v 20 गेर्षोमाच्या कुळातील: \li2 गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ, \li2 यहथाचा पुत्र जिम्माह, \v 21 जिम्माहाचा पुत्र योवाह, \li2 योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, \li2 जेरहचा पुत्र जेथेराय. \li1 \v 22 कोहाथाचे वंशज: \li2 कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, \li2 कोरहाचा पुत्र अस्सीर, \v 23 अस्सीरचा पुत्र एलकानाह, \li2 एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर, \li2 \v 24 अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, \li2 उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल. \li1 \v 25 एलकानाहचे वंशज: \li2 अमासय व अहीमोथ. \li2 \v 26 एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ, \li2 नहाथाचा पुत्र एलियाब, \v 27 एलियाबाचा पुत्र, \li2 यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, \li2 एलकानाहचा पुत्र शमुवेल. \li1 \v 28 शमुवेलाचे पुत्र: \li2 ज्येष्ठ योएल \li2 व दुसरा अबीयाह. \li1 \v 29 मरारीचे वंशज: \li2 महली, त्याचा पुत्र लिब्नी, \li2 त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह, \li2 \v 30 त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह \li2 व त्याचा पुत्र असायाह. \s2 मंदिराचे संगीतकार \p \v 31 कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते: \v 32 यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत. \b \lh \v 33 ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: \b \li1 कोहाथी पासून: \li2 गायक हेमान, \li2 जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र, \li2 \v 34 जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, \li2 जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र, \li2 \v 35 जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, \li2 जो महथचा पुत्र, जो अमासयचा पुत्र, \li2 \v 36 जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र, \li2 जो अजर्‍याहाचा पुत्र, जो सफन्याहाचा पुत्र, \li2 \v 37 जो तहथाचा पुत्र, जो अस्सीरचा पुत्र, \li2 जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहाचा पुत्र, \li2 \v 38 जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, \li2 जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र. \li1 \v 39 हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: \li2 आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र, \li2 \v 40 जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा\f + \fr 6:40 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa मासेया\fqa*\f* पुत्र, \li2 जो मल्कीयाहचा पुत्र, \v 41 जो एथनीचा पुत्र, \li2 जो जेरहचा पुत्र, जो अदायाहचा पुत्र, \li2 \v 42 जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, \li2 जो शिमीचा पुत्र, \v 43 जो यहथाचा पुत्र, \li2 जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र, \li1 \v 44 आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: \li2 एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, \li2 जो मल्लूखचा पुत्र, \v 45 जो हशब्याहाचा पुत्र, \li2 जो अमस्याहाचा पुत्र, जो हिल्कियाहचा पुत्र, \li2 \v 46 जो अमसीचा पुत्र, जो बानीचा पुत्र, \li2 जो शेमेरचा पुत्र, \v 47 जो महलीचा पुत्र, \li2 जो मूशीचा पुत्र, जो मरारीचा पुत्र, \li2 आणि जो लेवीचा पुत्र. \b \p \v 48 त्यांच्या लेवी भाऊबंदांना परमेश्वराच्या भवनाच्या निवासमंडपातील सर्व सेवेसाठी समर्पित करण्यात आलेले होते. \v 49 अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत. \b \li1 \v 50 अहरोनाचे वंशज: \li2 अहरोनाचा पुत्र एलअज़ार, त्याचा पुत्र फिनहास, \li2 त्याचा पुत्र अबीशूवा, \v 51 त्याचा पुत्र बुक्की, \li2 त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जरह्याह, \li2 \v 52 त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्‍याह, \li2 त्याचा पुत्र अहीतूब, \v 53 त्याचा पुत्र सादोक \li2 व त्याचा पुत्र अहीमाज. \b \lh \v 54 हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती): \li1 \v 55 यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले. \v 56 पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली. \v 57 अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह\f + \fr 6:57 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa आश्रयाचे शहर\fqa*\f* व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ, \v 58 हीलेन, दबीर, \v 59 आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह. \li1 \v 60 बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह. \lf त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती. \b \li1 \v 61 अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली. \li1 \v 62 गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली. \li1 \v 63 मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली. \b \lf \v 64 इस्राएली लोकांनी लेवी वंशजास ही नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली. \b \li1 \v 65 त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली. \b \lh \v 66 एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही: \li1 \v 67 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार, \v 68 योकमेअम, बेथ-होरोन, \v 69 अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह. \li1 \v 70 तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली. \b \lh \v 71 गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: \li1 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह; \li1 \v 72 इस्साखारच्या गोत्रातून केदेश व दाबरथ, \v 73 रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली; \li1 \v 74 आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार, \v 75 हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली; \li1 \v 76 नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली. \b \lh \v 77 लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: \li1 जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह; \li1 \v 78 यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार, \v 79 केदेमोथ व त्याचे शिवार आणि मेफाथ व त्याचे शिवार ही दिली; \li1 \v 80 आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार, \v 81 हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली. \c 7 \s1 इस्साखार \li1 \v 1 इस्साखारचे पुत्र: \li2 तोला, पुआह, याशूब व शिम्रोन; एकूण चार पुत्र. \li1 \v 2 तोलाचे पुत्र: \li2 उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती. \li1 \v 3 उज्जी पुत्र: \li2 इज्राह. \li1 इज्राहचा पुत्र: \li2 मिखाएल, ओबद्याह, योएल व इश्शीयाह असे एकूण पाच प्रमुख पुरुष होते. \v 4 त्यांच्या कुटुंबाप्रमाणे व पितृकुळाप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्याचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना पुष्कळ स्त्रिया व संतती होती. \lf \v 5 इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले. \s1 बिन्यामीन \li1 \v 6 बिन्यामीनचे तीन पुत्र: \li2 बेला, बेकेर व यदिएल. \li1 \v 7 बेलाचे पुत्र: \li2 एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते. \li1 \v 8 बेकेराचे पुत्र: \li2 जमीराह, योआश, एलिएजर, एलिओएनाइ, ओमरी, यरेमोथ, अबीयाह, अनाथोथ व अलेमेथ. \v 9 ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते. \li1 \v 10 यदिएलाचा पुत्र: \li2 बिल्हान. \li1 बिल्हानाचे पुत्र: \li2 यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर. \v 11 हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते. \li1 \v 12 ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम. \s1 नफताली \li1 \v 13 नफतालीचे पुत्र: \li2 यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम\f + \fr 7:13 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa शल्लूम\fqa*\f*. ही बिल्हाची संतती. \s1 मनश्शेह \li1 \v 14 मनश्शेहचे वंशज: \li2 त्याच्या पत्नीपासून त्याला अस्रिएल झाला. त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलआदाचा पिता माखीर झाला. \v 15 माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या. \v 16 माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम. \li1 \v 17 ऊलामाचा पुत्र: \li2 बदान. \li1 हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र. \li1 \v 18 त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली. \li1 \v 19 शेमीदाचे पुत्र: \li2 अह्यान, शेखेम, लिखी व अनीयाम. \s1 एफ्राईम \li1 \v 20 एफ्राईमचे वंशज: \li2 एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, \li2 त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह, \li2 त्याचा पुत्र तहथ, \v 21 त्याचा पुत्र जाबाद, \li2 त्याचा पुत्र शुथेलह. \li2 (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते. \v 22 यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले. \v 23 तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह\f + \fr 7:23 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa शोकांतिका\fqa*\f* असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते. \v 24 त्याची कन्या शेराह होती. तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेराह ही वसविली.) \li2 \v 25 त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ, \li2 रेशेफाचा पुत्र तेलह, तेलहाचा पुत्र तहन, \li2 \v 26 त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, \li2 त्याचा पुत्र एलीशामा, \v 27 त्याचा पुत्र नून \li2 व त्याचा पुत्र यहोशुआ. \lf \v 28 त्यांच्या वस्त्या व नगरे बेथेल व त्याच्या आसपासची गावे, पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची गावे, शेखेम व त्याची गावे, गाझा व त्याची गावे आणि अय्याहपर्यंत त्याची वतने होती. \v 29 त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात. \s1 आशेर \li1 \v 30 आशेराचे पुत्र: \li2 इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह, त्यांची बहीण सेराह. \li1 \v 31 बरीयाहचे पुत्र: \li2 हेबेर व मालकीएल, मालकीएल हा बिर्जाइथाचा पिता. \li1 \v 32 हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली. \li1 \v 33 यफलेटाचे पुत्र: \li2 पासख, बिह्माल व अश्वाथ. \lf ही यफलेटाची संतती होती. \li1 \v 34 शोमेराचे पुत्र: \li2 अही, रोहगाह, येहूब्बाह व अराम. \li1 \v 35 शोमेराचा भाऊ हेलेम याचे पुत्र: \li2 सोफह, इम्ना, शेलेश व आमाल. \li1 \v 36 सोफहाचे पुत्र: \li2 सूहा, हर्नेफेर, शूआल, बेरी, इम्राह, \v 37 बेसेर, होद, शाम्मा शिलशाह, इथरान\f + \fr 7:37 \fr*\ft दुसरे नाव \ft*\fqa येथेर\fqa*\f* व बैरा. \li1 \v 38 येथेराचे पुत्र: \li2 यफुन्नेह, पिस्पाह व अरा. \li1 \v 39 उल्लाचे पुत्र: \li2 आरह, हन्निएल, रिस्याह. \lf \v 40 आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले. \c 8 \s1 बिन्यामीन शौलाची वंशावळी \li1 \v 1 बिन्यामीनच्या पुत्रांची नावे: \li2 ज्येष्ठपुत्र बेला, \li2 दुसरा आशबेल, तिसरा अहरह, \li2 \v 2 चौथा नोआह व पाचवा राफा. \li1 \v 3 बेलाचे पुत्र: \li2 अद्दार, गेरा, अबीहूद,\f + \fr 8:3 \fr*\ft किंवा \ft*\fq गेरा \fq*\fqa एहूदचा बाप\fqa*\f* \v 4 अबीशूवा, नामान, अहोआह, \v 5 गेरा, शेफूफान व हुराम. \li1 \v 6 एहूदाचे पुत्र, जे गेबा येथील कुटुंबाचे प्रमुख होते, ज्यांचा पाडाव करून त्यांना मानाहथ येथे नेले ते: \li2 \v 7 नामान, अहीयाह व गेरा यास कैद करून पाठविण्यात आले. गेराचे पुत्र उज्जा व अहीहूद. \li1 \v 8 शहरयिमाने आपल्या पत्नी हुशीम व बारा यांच्यापासून घटस्फोट घेतला व मोआब देशामध्ये त्याला पुत्र झाले. \v 9 त्याची पत्नी होदेशच्या पोटी झालेले पुत्र: योबाब, सिब्या, मेशा, मल्काम, \v 10 यऊस, शख्याह व मिर्माह. हे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख होते. \v 11 हुशीमेपासून त्यास झालेले पुत्र अबीतूब व एल्पाल. \li1 \v 12 एल्पालाचे पुत्र: \li2 एबर, मिशाम व शमेद (ज्याने ओनो व लोद ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे वसविली), \v 13 बरीयाह व शमा हे अय्यालोन लोकांचे कुटुंबप्रमुख होते व त्यांनी गथकरास पळवून लावले. \li1 \v 14 अहियो, शशक, यरेमोथ, \v 15 जबद्याह, अराद, एदर, \v 16 मिखाएल, इश्पाह व योहा हे बरीयाहचे पुत्र. \li1 \v 17 जबद्याह, मशुल्लाम, हिज्की, हेबेर, \v 18 इश्मरय, इज्लीयाह व योबाब हे एल्पालाचे पुत्र. \li1 \v 19 याकीम, जिक्री, जब्दी, \v 20 अलीएनय, सिलथाई, एलीएल, \v 21 अदायाह, बरीयाह व शिम्राथ हे शिमीचे पुत्र. \li1 \v 22 इश्पान, एबर, एलीएल, \v 23 अब्दोन, जिक्री, हानान, \v 24 हनन्याह, एलाम, अनथोथीयाह, \v 25 इफदयाह व पेनुएल हे शशकाचे पुत्र. \li1 \v 26 शमशेराय, शहर्‍याह, अथल्याह, \v 27 यारेश्याह, एलीयाह व जिक्री हे यरोहामाचे पुत्र. \lf \v 28 हे त्यांच्या पिढीतील कुटुंबप्रमुख असून ते यरुशलेम येथे राहात असत. \b \li1 \v 29 गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. \li2 त्याच्या पत्नीचे नाव माकाह. \v 30 त्याच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब, \v 31 गदोर, अहियो, जेखर \v 32 आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली. \li1 \v 33 नेराला कीश झाला, कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल\f + \fr 8:33 \fr*\ft किंवा \ft*\fqa इश-बोशेथ\fqa*\f* हे पुत्र झाले. \li1 \v 34 योनाथानाचा पुत्र: \li2 मरीब-बाल\f + \fr 8:34 \fr*\ft किंवा \ft*\fqa मेफीबोशेथ\fqa*\f* ला मीखाह झाला. \li1 \v 35 मीखाहचे पुत्र: \li2 पीथोन, मेलेख, तरेया व आहाज. \li2 \v 36 आहाजास यहोअद्दा, यहोअद्दाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री, जिम्रीस मोसा. \v 37 मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. \li1 \v 38 आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे अशी: \li2 अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र. \li1 \v 39 त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: \li2 ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत. \v 40 ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. \li1 हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते. \b \c 9 \p \v 1 याप्रकारे सर्व इस्राएली लोकांच्या वंशावळ्या इस्राएलच्या व यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेल्या आहेत; या लोकांच्या अविश्वासूपणामुळे त्यांना बंदिवान करून बाबिलोन देशी नेले. \s1 यरुशलेमचे रहिवासी \lh \v 2 जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते. \b \lh \v 3 यहूदाह, बिन्यामीन, एफ्राईम व मनश्शेह यांच्यापैकी जे यरुशलेममध्ये राहण्यास आले: \li1 \v 4 ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता. \li1 \v 5 शिलोनी वंश: \li2 त्याचा ज्येष्ठपुत्र असायाह व त्याचे पुत्र. \li1 \v 6 जेरही वंश: \li2 यऊवेल. \lf यहूदाहचे 690 लोकही आले. \b \lh \v 7 बिन्यामीन वंशातून: \li1 सल्लू जो मशुल्लामाचा पुत्र, जो होदव्याहचा पुत्र व जो हस्सनुआहाचा पुत्र; \li1 \v 8 इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; \li1 एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; \li1 मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र; \lf \v 9 वंशावळीत नोंद झालेल्या बिन्यामीन लोकांची एकूण संख्या 956 होती. हे सर्व लोक कुटुंबप्रमुख होते. \b \lh \v 10 याजकातील: \li1 यदायाह; यहोयारीब; याखीन; \li1 \v 11 अजर्‍याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता; \li1 \v 12 अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; \li1 मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र. \lf \v 13 जे कुटुंबप्रमुख होते, त्या 1,760 याजकांची नोंद झाली. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवाकार्यास हे पुरुष जबाबदार होते. \b \lh \v 14 लेवींमधून: \li1 शमायाह जो हश्शूबचा पुत्र, जो अज्रीकामचा पुत्र, जो हशब्याहाचा पुत्र. हे मरारी वंशाचे होते; \li1 \v 15 बकबक्कार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्याह जो मीखाहचा पुत्र, जो जिक्रीचा पुत्र, जो आसाफचा पुत्र; \li1 \v 16 ओबद्याह जो शमायाहचा पुत्र, जो गालालचा पुत्र, जो यदूथूनचा पुत्र; \li1 जो बेरेख्याहचा पुत्र, जो आसाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो नटोफाथीच्या वस्तीत राहत असे. \b \lh \v 17 द्वारपाल: \li1 शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता; \v 18 आजवर ते राजाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर कार्यरत आहेत; लेवींच्या छावणीचे द्वारपाल हेच होते. \li1 \v 19 शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत. \li1 \v 20 पूर्वीच्या काळी एलअज़ारचा पुत्र फिनहास या सर्वांवर द्वारपालांचा अधिकृत अधिकारी होता. याहवेहचे सानिध्य त्यांच्याबरोबर होते. \li1 \v 21 मशेलेम्याहचा पुत्र जखर्‍याह सभामंडपाचा द्वारपाल होता. \lf \v 22 द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. \b \p विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते. \v 23 ते व त्यांचे वंशज याहवेहच्या भवनाच्या म्हणजे सभामंडपाच्या द्वारपालाचे काम पाहत असत. \v 24 पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना द्वारपाल ठेवण्यात आले होते. \v 25 त्यांच्या गावात राहणारे त्यांचे भाऊबंद सात दिवसात पाळीपाळीने कार्य करीत. \v 26 परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती. \v 27 परमेश्वराच्या भवनाचे रक्षण त्यांच्याकडे सोपविले असल्यामुळे रात्री ते मंदिराच्या आसपास राहत असत आणि दररोज सकाळी परमेश्वराचे भवन उघडण्यासाठी चावी त्यांच्याच ताब्यात असे. \p \v 28 सेवेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काहीजणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते मोजून आत ठेवीत व मोजून बाहेर काढीत. \v 29 त्यांच्यापैकी काहीजणांकडे सामानसुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये यांची व्यवस्था असे. \v 30 याजकांपैकी काहीजण सुगंधी मसाले तयार करीत असत. \v 31 तव्यावर विश्वासयोग्यतेने ज्या वस्तू भाजण्यात येत, त्यावर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी कोरही शल्लूमचा ज्येष्ठपुत्र मत्तिथ्याहला नेमले. \v 32 कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती. \p \v 33 काही लेवी कुटुंबप्रमुख जे मंदिरातील संगीतासाठी जबाबदार होते, ते मंदिराच्या काही खोल्यात राहत असत आणि त्यांना संगीताशिवाय इतर कामे नव्हती, कारण त्या कामाची त्यांना रात्रंदिवस जबाबदारी देण्यात आली होती. \p \v 34 हे सर्व लेवी वंशातील कुटुंबप्रमुख असून त्यांची प्रमुख म्हणून वंशावळीत नोंद झाली होती, ते यरुशलेमात राहात. \s1 शौलाची वंशावळ \li1 \v 35 गिबोनचा\f + \fr 9:35 \fr*\ft किंवा \ft*\fqa सेनानायक\fqa*\f* पिता ईयेल गिबोन येथे स्थायिक झाला. \li2 त्याच्या पत्नीचे नाव माकाह होते. \v 36 त्याच्या पुत्रांची नावे अशी: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब, \v 37 गदोर, अहियो, जखर्‍याह आणि मिकलोथ. \v 38 मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली. \li1 \v 39 नेराला कीश झाला; कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले. \li1 \v 40 योनाथानाचा पुत्र: \li2 मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह. \li1 \v 41 मीखाहचे पुत्र: \li2 पीथोन, मेलेख, तहरेया व आहाज. \li2 \v 42 आहाजास येरह\f + \fr 9:42 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa यादाह\fqa*\f*, यादाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री झाले, जिम्रीस मोसा. \v 43 मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. \li1 \v 44 आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे: \li2 अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते. \c 10 \s1 शौल स्वतःचा प्राणत्याग करतो \p \v 1 पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले, आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले. \v 2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा आवेशाने पाठलाग केला आणि त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले. \v 3 शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धऱ्यांनी त्याला गाठले व त्याला जखमी केले. \p \v 4 तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.” \p परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने त्याची स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला. \v 5 जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि मरण पावला. \v 6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र मरण पावले, त्याचे सर्व कुटुंब एकत्रच मृत्यू पावले. \p \v 7 जेव्हा खोर्‍यात असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पलायन केले. पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली. \p \v 8 दुसर्‍या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे पुत्र मृत होऊन पडलेले दिसले. \v 9 त्यांनी शौलास लुबाडून, त्याचे शिर व त्याचे शस्त्र काढून घेतले आणि पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींमध्ये आणि आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले. \v 10 त्यांनी त्याची शस्त्रे त्यांच्या दैवतांच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शिर दागोनाच्या मंदिरात टांगले. \p \v 11 पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या रहिवाशांनी ऐकले, \v 12 तेव्हा त्यांचे सर्व शूर पुरुष रणांगणावर गेले व त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह याबेश येथे परत आणले. त्यांच्या अस्थी याबेश येथील एला झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला. \p \v 13 याहवेहशी अविश्वासू राहिल्यामुळे शौलाला मृत्यू आला; कारण त्याने याहवेहची आज्ञा न पाळता, एका भूतविद्याप्रवीण स्त्रीचा सल्ला घेतला, \v 14 आणि याहवेहचे मार्गदर्शन नाकारले, यामुळे याहवेहने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य इशायाचा पुत्र दावीदास सोपविले. \c 11 \s1 दावीद इस्राएलचा राजा झाला \p \v 1 मग इस्राएलचे पुढारी एकत्र आले व हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत. \v 2 मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ” \p \v 3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते. \s1 दावीद यरुशलेम जिंकून घेतो \p \v 4 नंतर दावीद व इस्राएलचे सर्व लोक मिळून यरुशलेमला (म्हणजे यबूसला) गेले. \v 5 तिथे राहणारे यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही.” तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे. \p \v 6 दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसींवर हल्ला करण्यात पुढाकार घेईल तो सेनापती होईल.” मग जेरुइयाहचा पुत्र योआबने पहिल्याने आक्रमण करण्यास गेल्यामुळे तो दावीदाच्या सैन्याचा सेनापती झाला. \p \v 7 तेव्हा दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला, म्हणून त्याला दावीदाचे शहर असे नाव पडले. \v 8 दावीदाने मिल्लोपासून गडाभोवतालच्या शहराच्या भागाचा विस्तार केला आणि योआबाने बाकी यरुशलेमची पुनर्बांधणी केली. \v 9 आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण सर्वसमर्थ याहवेह त्याच्याबरोबर होते. \s1 दावीदाचे शूर योद्धे \p \v 10 दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्‍यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला. \v 11 दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे: \p हखमोनी याशबआम\f + \fr 11:11 \fr*\ft दुसरे नाव \ft*\fqa यशोब-बाल\fqa*\f* हा दावीदाच्या सैन्यातील पहिल्या श्रेणीच्या वीरांपैकी होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात तीनशे लोकांना मारून टाकले. \p \v 12 त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी, दोदोचा पुत्र एलअज़ार होता, तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता. \v 13 पस-दम्मीम येथे पलिष्ट्यांबरोबर केलेल्या लढाईत तो दावीदाबरोबर होता. तो जवाच्या शेतात असताना इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता. \v 14 परंतु ते त्या शेताच्या मध्यभागी उभे राहिले, त्यांनी सामना केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला. \p \v 15 जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्‍यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले. \v 16 त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती. \v 17 दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे झाले असते!” \v 18 तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले. \v 19 त्याने म्हटले, “परमेश्वर न करो मला ते करावे लागेल. ज्या पुरुषांनी ते आपला जीव धोक्यात घालून आणले त्यांचे रक्त मी प्यावे काय?” कारण ते आणण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला होता. त्यामुळे दावीद ते पाणी प्याला नाही. \p अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती. \p \v 20 योआबाचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांविरुद्ध उगारून त्यांचा वध केला होता, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता. \v 21 या तिघांपेक्षा त्याला दुप्पट सन्मान दिला गेला आणि तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती केली नाही. \p \v 22 कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले. \v 23 एकदा त्याने पाच हात\f + \fr 11:23 \fr*\ft अंदाजे 2.3 मीटर\ft*\f* उंचीच्या इजिप्ती मनुष्याला जिवे मारले होते. त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, तरी बेनाइयाह केवळ आपली विणकर्‍याची काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारले. \v 24 यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती. \v 25 इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले. \b \lh \v 26 दावीदाचे पराक्रमी योद्धे हे होते: \b \li1 योआबाचा भाऊ असाहेल, \li1 बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान, \li1 \v 27 हरोरचा शम्मोथ, \li1 पलोनी हेलेस, \li1 \v 28 तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा, \li1 अनाथोथचा अबिएजेर, \li1 \v 29 हुशाथचा सिब्बखय, \li1 अहोहचा ईलाय, \li1 \v 30 नटोफाथी माहाराई, \li1 नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेद, \li1 \v 31 गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तय, \li1 पिराथोनचा बेनाइयाह, \li1 \v 32 गाशाच्या ओढ्याजवळचा हूरय, \li1 अर्बाथचा अबीएल, \li1 \v 33 बहरूमचा अजमावेथ, \li1 शालबोनचा एलीहबा, \li1 \v 34 गिजोन येथील हाशेमचे पुत्र, \li1 हरार येथील शागे याचा पुत्र योनाथान, \li1 \v 35 हरार येथील साखार याचा पुत्र अहीयाम, \li1 ऊरचा पुत्र एलिफाल, \li1 \v 36 मकेराथी हेफेर, \li1 पलोनी अहीयाह, \li1 \v 37 कर्मेलचा हेस्रो, \li1 एजबयाचा पुत्र नाराय, \li1 \v 38 नाथानाचा भाऊ योएल, \li1 हागरीचा पुत्र मिभार, \li1 \v 39 अम्मोनी सेलेक, \li1 जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक बैरोथचा नाहाराई, \li1 \v 40 इथ्री येथील ईरा, \li1 इथ्री येथील गारेब, \li1 \v 41 उरीयाह हिथी, \li1 अहलायाचा पुत्र जाबाद, \li1 \v 42 शीझाचा पुत्र अदीना, तो रऊबेनच्या गोत्रातील एकतीस पुढार्‍यांपैकी एक होता. \li1 \v 43 माकाहचा पुत्र हानान, \li1 मिथनी योशाफाट, \li1 \v 44 अष्टराथी उज्जिया, \li1 अरोएर येथील होथामाचे पुत्र शामा व ईयेल, \li1 \v 45 शिम्रीचा पुत्र यदिएल, \li1 व तीसा येथील त्याचा भाऊ योहा, \li1 \v 46 महवी येथील एलीएल, \li1 व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्याह, \li1 मोआबी इथ्माह, \li1 \v 47 मसोबी एलीएल, ओबेद आणि यासीएल. \c 12 \s1 दावीदास येऊन मिळालेले योद्धे \lh \v 1 कीशाचा पुत्र शौलाच्या सानिध्यातून हद्दपार केलेले असताना दावीदाला सिकलाग येथे येऊन मिळालेले योद्धे (ज्यांनी त्याला युद्धात साहाय्य केले त्या योद्ध्यांपैकी असलेले; \v 2 हे सर्वच धनुर्धारी वीर असून आपल्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्‍यबाण मारण्यात प्रवीण होते. ते सर्वच बिन्यामीन गोत्रातील आणि शौल राजाचे नातलग होते): \b \li1 \v 3 त्यातील प्रमुख शमाहाचे पुत्र अहीएजर व त्याचा भाऊ योआश, हे गिबियाहचे रहिवासी होते. \li1 अजमावेथचे पुत्र यजिएल व पेलेट, \li1 बेराखाह व अनाथोथचा रहिवासी येहू. \v 4 इश्मायाह हा गिबोनी होता. हा तीस वीरांतील अत्यंत शूरवीर असून त्या तिसांवरील मुख्य होता. \li1 यिर्मयाह, यहजिएल, योहानान, गदेराथी योजाबाद, \v 5 एलूजय, यरिमोथ, बाल्या, शमारियाह व हरूफी शफात्याह, \li1 \v 6 एलकानाह, इश्शीयाह, अजरएल, योबेजर व याशबआम हे सर्व कोरही वंशज होते. \li1 \v 7 योएलाह व जबद्याह हे गदोर येथील यरोहामाचे पुत्र होते. \b \p \v 8 गादचे महान शूर वीरसुध्दा फितूर होऊन दावीद अरण्यवासात असताना त्याच्याकडे गेले. ते ढाली व भाले वापरण्यात निष्णात होते. त्यांचे चेहरे सिंहाच्या मुखासारखे असून ते डोंगरावरील हरणांसारखे चपळ होते. \b \li1 \v 9 एजेर हा त्यांचा प्रमुख सेनाधिकारी होता. \li1 ओबद्याह त्यांचा उपप्रमुख, एलियाब तिसरा, \li1 \v 10 मिश्मन्नाह चौथा, यिर्मयाह पाचवा, \li1 \v 11 अत्तय सहावा, एलीएल सातवा, \li1 \v 12 योहानान आठवा, एलजाबाद नववा, \li1 \v 13 यिर्मयाह दहावा आणि मखबन्नय अकरावा. \b \p \v 14 हे गाद गोत्राचे असून सैन्यातील अधिकारी होते; त्यातील जो सर्वात कनिष्ठ होता, तो शंभरांच्या तोडीचा होता व सर्वात ज्येष्ठ हजाराच्या तोडीचा. \v 15 वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असताना त्यांनी ती ओलांडली आणि नदीच्या खोर्‍यांत राहणार्‍या लोकांची त्यांनी पूर्वेकडे व पश्चिमेकडे दाणादाण उडविली. \p \v 16 बिन्यामीन व यहूदाह गोत्रातील दुसरे काहीजण दावीदाकडे गडावर आले. \v 17 दावीद त्यांच्या भेटीसाठी बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही मला मदत करावयास शांतीने आला असाल, तर तुम्हाला सहभागी करण्यास मी तयार आहे. पण मी निरपराध असताना मला शत्रूंच्या हवाली करण्यासाठी, माझा विश्वासघात करावयास तुम्ही आला असाल, तर आपल्या पूर्वजांचा परमेश्वर तुम्हाला पाहून घेईल व तुमचा न्याय करेल.” \p \v 18 तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: \q1 “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! \q2 अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! \q1 तुम्हाला शांती, कल्याण लाभो, \q2 आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. \q3 कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” \p मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले. \p \v 19 आणि दावीद पलिष्ट्यांशी शौलाच्या विरुद्ध लढायला गेला तेव्हा मनश्शेह गोत्रातीलही काही लोक दावीदाकडे फितूर झाले. (तरीही दावीद आणि त्याच्या माणसांनी पलिष्ट्यांची मदत केली नाही, कारण सल्लामसलत करून त्यांच्या अधिकार्‍यांनी त्याला पाठवून दिले. ते म्हणाले, “जर आपला धनी शौल याकडे तो फितूर झाला तर आमची शिरे धोक्यात जातील.”) \v 20 दावीद सिकलाग येथे जात असताना मनश्शेह गोत्रातील जे लोक दावीदाला येऊन मिळाले, त्यांची यादी पुढे दिली आहे: अदनाह, योजाबाद, यदिएल, मिखाएल, यहोजाबाद, एलीहू व सिलथाई. ते सर्वजण मनश्शेह गोत्रातील उच्च श्रेणीचे सहस्त्राधिपती होते. \v 21 ते शूर योद्धे होते. त्यांनी पलिष्ट्यांच्या गनिमी युद्धाविरुद्ध दावीदाला मदत केली आणि ते त्याच्या सैन्यात सेनाधिकारी होते. \v 22 दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी\f + \fr 12:22 \fr*\ft किंवा \ft*\fqa बलवान सैन्य\fqa*\f* प्रचंड सेना जमा झाली. \s1 हेब्रोन येथे दावीदाला इतरजण येऊन मिळतात \lh \v 23 दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते. \b \li1 \v 24 यहूदाह गोत्रातील ढाल व भाला धारण करणारे हत्यारबंद 6,800 योद्धे; \li1 \v 25 शिमओनी गोत्रातले शूर व पराक्रमी योद्धे 7,100; \li1 \v 26 लेव्यातील 4,600, \v 27 याजकांपैकी अहरोन घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते. \v 28 सादोक हा तरुण असून मोठा धैर्यवान लढवय्या होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या पित्याच्या घराण्यातील 22 सरदार होते; \li1 \v 29 बिन्यामीनच्या म्हणजे शौलाच्या गोत्रातील 3,000, यातील बहुतेक या वेळेपर्यंत शौलाशा एकनिष्ठ राहिले होते; \li1 \v 30 एफ्राईमी, हे महान योद्धे आपआपल्या कुळांमध्ये नामांकित असे पुरुष 20,800; \li1 \v 31 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातले लोक दावीदाला राजा होण्यास मदत करण्यासाठी तातडीने पाठविण्यात आलेल्या सैन्यात होते 18,000; \li1 \v 32 इस्साखार गोत्रातले 200 पुढारी आले, काळाची पावले ओळखून इस्राएलने काय करावे हे त्यांना समजत होते. त्यांचे सर्व भाऊबंद त्याच्या आज्ञेत होते; \li1 \v 33 जबुलून गोत्रातले निष्णात लढवय्ये 50,000, ते शस्त्रांनी सुसज्ज व दावीदाला एकनिष्ठ होते; \li1 \v 34 नफतालीचे 1,000 अधिकारी आणि भाले व ढाली यांनी सुसज्ज असे 37,000 सैनिक; \li1 \v 35 दान गोत्राचे लढाईसाठी सुसज्ज सैनिक 28,600; \li1 \v 36 आशेर गोत्राचे अनुभवी, सुसज्ज सैनिक 40,000; \li1 \v 37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील काठावर राहणारे रऊबेनी, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातील सर्व शस्त्रांनिशी सज्ज सैनिक 1,20,000. \b \lf \v 38 हे सर्व योद्धे, जे सेनेत त्यांच्या हुद्यानुसार सहभागी होण्यास स्वेच्छेने आले. \b \p ते हेब्रोनला आले तेव्हा दावीदाला इस्राएलचा राजा करणे हा त्यांचा एकच उद्देश होता. वास्तविक पाहता सर्व इस्राएलींनी या गोष्टीस मान्यता दिली होती. \v 39 त्यांनी तिथे तीन दिवस दावीदाबरोबर घालवून, खाणेपिणे केले, कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांचा तसा प्रबंध केला होता. \v 40 शेजारच्या लोकांनी म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली प्रांतांपर्यंत जे राहत होते, त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल इत्यादी खाण्याच्या वस्तू गाढवे, उंट खेचरे व बैल यांच्यावर लादून आणल्या होत्या. त्याचप्रमाणे असंख्य बैल व शेरडेमेंढरे पण आणली होती. कारण इस्राएलात सर्वत्र आनंदोत्सव साजरा होत होता. \c 13 \s1 कोश परत आणणे \p \v 1 दावीदाने आपल्या सेनाधिकार्‍यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला. \v 2 जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या. \v 3 त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचा कोश परत आणू या. कारण शौल राजाच्या कारकिर्दीत आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते\f + \fr 13:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa त्याची विचारपूस केली नाही\fqa*\f*.” \v 4 तेव्हा संपूर्ण सभेने एकमताने होकार दिला व सर्व लोकांना ते योग्य वाटले. \p \v 5 मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले. \v 6 दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे करुबांमध्ये आरूढ असलेला, जो त्या नावाने संबोधित केला जातो, तो याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी निघाले. \p \v 7 त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते. \v 8 दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते. \p \v 9 जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. \v 10 त्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला आणि त्याने कोशाला हात लावला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले. आणि तो परमेश्वरापुढे मरण पावला. \p \v 11 तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह\f + \fr 13:11 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa उज्जाविरुद्ध तडाखा\fqa*\f* असे म्हणतात. \p \v 12 त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?” \v 13 त्याने कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात नेला नाही. त्याऐवजी त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला. \v 14 परमेश्वराचा कोश ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याच्या घराण्यास व त्याचे जे काही होते त्या सर्वास आशीर्वाद दिला. \c 14 \s1 दावीदाचे घर व कुटुंब \p \v 1 आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले व दावीदासाठी राजवाडा बांधावा म्हणून त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे, गवंडी व सुतार पाठवले. \v 2 आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे. \p \v 3 यरुशलेमात दावीदाने अनेक पत्नी व उपपत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. \v 4 यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन, \v 5 इभार, एलीशुआ, एल्पलेट, \v 6 नोगा, नेफेग, याफीय, \v 7 एलीशामा, बिलिआदा\f + \fr 14:7 \fr*\ft किंवा \ft*\fqa एलयादा\fqa*\f* व एलिफेलेत. \s1 दावीद पलिष्ट्यांचा पराभव करतो \p \v 8 इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला. \v 9 इकडे पलिष्टी लोकांनी येऊन रेफाईमच्या खोर्‍याला लुटले. \v 10 तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” \p याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, मी त्यांना तुझ्या हातात देईन.” \p \v 11 म्हणून दावीद व त्याचे सैन्य बआल-पेरासीम येथे गेले आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वराने माझ्याद्वारे शत्रूंचा नाश केला आहे.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम\f + \fr 14:11 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa परमेश्वर जे तुटून पडतात\fqa*\f*, हे नाव पडले. \v 12 पलिष्टी लोकांनी त्यांची दैवते टाकून दिली व दावीदाने ती अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली. \p \v 13 पुन्हा एकदा पलिष्टी लोकांनी खोर्‍यात हल्ला केला. \v 14 तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर. \v 15 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.” \v 16 तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्यांना ठार केले. \p \v 17 दावीदाची किर्ती संपूर्ण प्रदेशात पसरत गेली. सर्व राष्ट्रांना त्याचे भय वाटावे असे याहवेहने केले. \c 15 \s1 कोश यरुशलेमात आणतात \p \v 1 आता दावीदाने स्वतःसाठी दावीद नगर यरुशलेममध्ये भवने बांधली व त्याने परमेश्वराच्या कोशाकरिता एक स्थान सिद्ध करून तिथे एक नवा तंबू ठोकला. \v 2 नंतर दावीदाने म्हटले, “लेव्यांशिवाय इतर कोणीही परमेश्वराचे कोश वाहू नये, कारण याहवेहने त्यांना त्यांचे कोश वाहण्यासाठी निवडले आहे, त्यांची सेवा निरंतर करण्यासाठी निवडले आहे.” \p \v 3 नंतर याहवेहचा कोश नव्या तंबूत आणण्याच्या समारंभासाठी दावीदाने इस्राएलाच्या सर्व लोकांना यरुशलेममध्ये एकत्र केले. \b \lh \v 4 दावीदाने अहरोनाच्या वंशजांना आणि लेवींना एकत्र बोलाविले: \b \li1 \v 5 कोहाथी वंशातील, \li2 प्रमुख उरीएल व त्याचे 120 भाऊबंद; \li1 \v 6 मरारीच्या वंशातील, \li2 प्रमुख असायाह व त्याचे 220 भाऊबंद; \li1 \v 7 गेर्षोमाच्या वंशातील, \li2 प्रमुख योएल व त्याचे 130 भाऊबंद; \li1 \v 8 एलीजाफानच्या वंशातील, \li2 प्रमुख शमायाह व त्याचे 200 भाऊबंद; \li1 \v 9 हेब्रोनाच्या वंशातील, \li2 प्रमुख एलीएल व त्याचे 80 भाऊबंद; \li1 \v 10 उज्जीएलाच्या वंशातील, \li2 प्रमुख अम्मीनादाब व त्याचे 112 भाऊबंद. \b \p \v 11 नंतर दावीदाने सादोक व अबीयाथार या मुख्य याजकांना व उरीएल, असायाह, योएल, शमायाह, एलीएल व अम्मीनादाब या लेवी पुढार्‍यांना बोलाविणे पाठविले. \v 12 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी वंशातील कुटुंबप्रमुख आहात; आता तुमच्या सर्व बांधवांसमवेत तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएली लोकांच्या याहवेह परमेश्वराचा कोश मी तयार केलेल्या जागेवरील नव्या तंबूत आणावयाचा आहे. \v 13 याहवेह आपले परमेश्वर आपल्यावर पूर्वी क्रोधाविष्ट झाले, कारण तुम्ही लेवी लोकांनी तो उचलून आणला नाही. नेमून दिलेल्या विधीनुसार आपण कोश कोणत्या पद्धतीने उचलावयाचा यासंबंधी कधी चौकशी केली नाही.” \v 14 तेव्हा याजक व लेवी यांनी इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी स्वतःला विधिपूर्वक शुद्ध केले. \v 15 याहवेह परमेश्वराने मोशेला ज्या सूचना दिल्या होत्या त्याबरहुकूम लेव्यांनी कोशाचे खांब खांद्यांवर घेऊन तो वाहिला. \p \v 16 दावीदाने लेवी पुढार्‍यांना गायकवर्ग व वाद्यवृंद तयार ठेवण्यास सांगितले. या वाद्यवृंदानेः सतार, वीणा व झांजा उच्चस्वराने आणि हर्षाने वाजविल्या. \p \v 17 लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले. \v 18 पुढे नमूद केलेल्या कुटुंबातील लोक त्यांचे सहायक म्हणून नेमले: जखर्‍याह, बेन, यजिएल, शमिरामोथ, यहीएल, उन्नी, एलियाब, बेनाइयाह, मासेयाह, मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह. ओबेद-एदोम व ईयेल\f + \fr 15:18 \fr*\ft व अजऱ्याह\ft*\f* हे द्वारपाल होते. \p \v 19 संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते. \v 20 जखर्‍याह, अजीएल, शमिरामोथ यहीएल, उन्नी, एलियाब, मासेयाह व बेनाइयाह यांना अलामोथ या संगीत रागावर सारंगी वाजविण्यास नेमले. \v 21 मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह, ओबेद-एदोम, ईयेल, व अजज्याह यांना शमीनीथ सुरावर वीणा वाजविण्यास नेमले होते. \v 22 लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता. \p \v 23 बेरेख्याह व एलकानाह हे कोशाचे द्वारपाल होते. \v 24 शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्‍याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते. \p \v 25 म्हणून दावीद, इस्राएलचे वडीलजन, सैन्याचे उच्चाधिकारी याहवेहच्या कराराचा कोश यरुशलेममध्ये आणण्यासाठी मोठ्या हर्षाने ओबेद-एदोमच्या घरी गेले. \v 26 याहवेह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या लेव्यांची याहवेहने मदत केली म्हणून सात बैल आणि सात गोर्‍हे अर्पण केले गेले. \v 27 दावीद, कोश वाहणारे सर्व लेवी, सर्व गायक व गायकांचा मुख्य संगीतकार कनन्याह होता, या सर्वांनी तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. दावीदाने तागाचे एफोद घातले होते. \v 28 अशाप्रकारे इस्राएलाच्या सर्व लोकांनी हर्षाने जयघोष करीत, रणशिंगे, कर्णे, झांजा, सतार व वीणा यांच्या मोठ्या निनादात याहवेहचा कराराचा कोश आणला. \p \v 29 याहवेहच्या कराराचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर नाचत आणि हर्ष करीत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला. \c 16 \s1 कोशापुढे आराधना \p \v 1 त्यांनी देवाचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला आणि परमेश्वरासमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली. \v 2 होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर दावीदाने लोकांना याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला. \v 3 नंतर त्याने इस्राएल लोकांच्या प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप व मनुक्यांची एक वडी वाटप केली. \p \v 4 इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्‍या काही लेवी लोकांची नेमणूक केली: \v 5 वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्‍याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे. \v 6 बेनाइयाह व यहजिएल हे याजक परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे नियमितपणे कर्णे वाजवित. \b \p \v 7 त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले: \q1 \v 8 याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; \q2 त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा. \q1 \v 9 त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; \q2 त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा. \q1 \v 10 त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; \q2 जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो. \q1 \v 11 याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; \q2 सतत त्यांचे मुख शोधा. \b \q1 \v 12 परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, \q2 आणि त्यांनी केलेले न्याय \q2 यांचे स्मरण करा. \q1 \v 13 अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, \q2 त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, \q2 तुम्ही या सर्वांचे स्मरण करा. \q1 \v 14 कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. \q2 त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत. \b \q1 \v 15 ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, \q2 ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती, \q1 \v 16 हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, \q2 आणि इसहाकाशी शपथ वाहिली, \q1 \v 17 आणि त्यांनी याकोबासाठी नियम \q2 व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला: \q1 \v 18 “मी तुम्हाला कनान देश \q2 तुमचे वतन म्हणून देईन.” \b \q1 \v 19 त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते \q2 निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते. \q1 \v 20 ते एका देशातून दुसर्‍या देशात, \q2 एका राज्यातून दुसर्‍या राज्यात भटकत असताना, \q1 \v 21 याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; \q2 त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले: \q1 \v 22 “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; \q2 माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.” \b \q1 \v 23 हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा, \q2 दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा. \q1 \v 24 सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, \q2 सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा. \b \q1 \v 25 कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; \q2 सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे. \q1 \v 26 इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. \q2 परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे. \q1 \v 27 राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. \q2 त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि हर्ष असतो. \b \q1 \v 28 अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, \q2 याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या. \q1 \v 29 याहवेहच्या नावाला योग्य तो गौरव द्या; \q2 अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या. \q1 त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; \q2 \v 30 त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो! \q2 सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही. \b \q1 \v 31 आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो; \q2 त्यांनी राष्ट्रांना हे सांगावे, “याहवेह राज्य करतात!” \q1 \v 32 सागर व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; \q2 शेते व त्यातील सर्वकाही हर्षित होवो! \q1 \v 33 वनातील सर्व झाडे गुणगान करो, \q2 आनंदाने याहवेहची स्तुती करा, \q2 कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत. \b \q1 \v 34 याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; \q2 त्यांची प्रीती अनंतकाळची आहे. \q1 \v 35 यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा; \q2 परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा, \q1 जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, \q2 तुमच्या स्तवनात गौरव मानावे. \q1 \v 36 इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, \q2 अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. \m मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.” \b \p \v 37 दररोज गरजेप्रमाणे आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांची याहवेहच्या कोशाची नियमितपणे करारबद्ध सेवा करण्यासाठी दावीदाने नेमणूक केली. \v 38 तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला. \p \v 39 दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले. \v 40 ते दररोज, सकाळ व संध्याकाळ, याहवेहने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेनुसार होमवेदीवर नियमितपणे होमार्पणे करीत होते. \v 41 त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते. \v 42 त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. \p \v 43 नंतर सर्व लोक आपापल्या नगरास परत गेले आणि दावीदही आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला. \c 17 \s1 याहवेहने दावीदाला अभिवचन दिले \p \v 1 जेव्हा दावीद आपल्या राजवाड्यात राहत असताना, त्याने नाथान संदेष्ट्यास म्हटले, “पाहा, येथे मी गंधसरूच्या भवनात राहतो, परंतु याहवेहच्या कराराचा कोश एका तंबूत आहे!” \p \v 2 नाथानाने दावीदाला उत्तर दिले, “आपल्या मनात जे काही आहे त्यानुसार करा, कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहेत.” \p \v 3 परंतु त्याच रात्री परमेश्वराचे वचन असे नाथानाकडे आले: \pm \v 4 “जा आणि माझा सेवक दावीदला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार नाहीस. \v 5 इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही, तंबू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणात, या निवासस्थानातून त्या निवासस्थानात फिरत राहिलो आहे. \v 6 जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही पुढार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे भवन का बांधले नाही असे कधी मी म्हटले काय?” ’ \pm \v 7 “तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले. \v 8 जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी, पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव करेन. \v 9 आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना आपले स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये. \v 10 मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून असेच घडले. मी तुझ्या सर्व शत्रूंचा ताबा घेईन. \pm “ ‘मी असे जाहीर करतो की याहवेह तुझ्यासाठी एक घर बांधतील: \v 11 जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन. \v 12 तोच माझ्यासाठी घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन. \v 13 मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल; ज्याप्रकारे मी तुझ्या पूर्वजापासून काढून घेतले होते तसे मी माझे प्रेम कधीही त्याच्यापासून काढून घेणार नाही. \v 14 मी त्याला माझ्या मंदिरावर आणि माझ्या राज्यावर नेमीन; त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ” \p \v 15 या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला. \s1 दावीदाची प्रार्थना \p \v 16 तेव्हा दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाला: \pm “हे याहवेह परमेश्वरा, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की, तुम्ही मला येथवर आणावे? \v 17 माझ्या परमेश्वरा, तुमच्या दृष्टीने हे जणू पुरेसे नव्हते, तर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे. याहवेह परमेश्वरा, मी जणूकाही कोणीतरी फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, अशा नजरेने तुम्ही माझ्याकडे बघितले आहे. \pm \v 18 “तुम्ही दावीद या आपल्या सेवकाला मोठा सन्मान दिला आहे, तर मी पुढे काय बोलू? आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. \v 19 हे याहवेह, तुम्ही आपल्या सेवकासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे हे सर्व महान कार्य केले आहे आणि थोर अभिवचन दिले आहे. \pm \v 20 “हे याहवेह, तुमच्यासारखे कोणी परमेश्वर नाही. जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार तुमच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही. \v 21 आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहे; पृथ्वीवरील असे एक राष्ट्र, ज्यांच्या परमेश्वरांनी बाहेर जाऊन स्वतःसाठी व तुमच्या नावासाठी इजिप्तमधून त्यांना खंडून घेतले, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले? \v 22 तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना सर्वकाळासाठी तुमचे स्वतःचे खास लोक बनविले आहे आणि हे याहवेह तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात. \pm \v 23 “तर आता, हे याहवेह, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळासाठी स्थापित करावे. आपण म्हटल्याप्रमाणे ते आपण करावे. \v 24 यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे. \pm \v 25 “हे माझ्या परमेश्वरा, तुम्ही तुमच्या सेवकास प्रकट केले आहे, की तुम्ही त्याच्यासाठी एक घर बांधाल. त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे. \v 26 याहवेह, परमेश्वर तुम्हीच आहात! तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे. \v 27 आता आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यास तुम्ही प्रसन्न आहात, म्हणजे ते तुमच्या दृष्टीत सदैव राहावे; कारण हे याहवेह, तुम्ही ते आशीर्वादित केले आहे, आणि ते सदैव आशीर्वादित व्हावे.” \c 18 \s1 दावीदाची यशोगाथा \p \v 1 काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली. \p \v 2 दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. \p \v 3 याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने\f + \fr 18:3 \fr*\ft किंवा \ft*\fqa आपली सत्ता स्थापित करावयास\fqa*\f* सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला. \v 4 दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या. \p \v 5 जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले. \v 6 नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला. \p \v 7 हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. \v 8 हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ\f + \fr 18:8 \fr*\ft किंवा \ft*\fqa तेबाह\fqa*\f* व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले. \p \v 9 हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, \v 10 तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ\f + \fr 18:10 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa तोई\fqa*\f* यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या. \p \v 11 दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी. \p \v 12 जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्‍यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले. \v 13 त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला. \s1 दावीदाचे अधिकारी \p \v 14 दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे. \b \li1 \v 15 जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता; \li1 आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा. \li1 \v 16 अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख\f + \fr 18:16 \fr*\ft इतर मूळ प्रतींनुसार \ft*\fqa अबीमेलेख\fqa*\f* याजक; \li1 शावेशा राजाचा चिटणीस होता. \li1 \v 17 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता. \li1 दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते. \c 19 \s1 दावीद अम्मोन्यांचा पराभव करतो \p \v 1 कालांतराने, अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावल्यानंतर त्याचा पुत्र राजा झाला. \v 2 दावीदाने विचार केला, “हानूनचा पिता नाहाशने माझ्यावर दया दाखविली होती, तशी दया मी हानूनवर दाखवेन.” म्हणून दावीदाने हानूनच्या पित्याविषयी आपली सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवले. \p जेव्हा दावीदाचे राजदूत अम्मोनी लोकांच्या प्रदेशात आले, \v 3 तेव्हा अम्मोनी अधिकार्‍यांनी हानूनला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे राजदूत पाठवून तुमच्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ देशाची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?” \v 4 तेव्हा हानूनने दावीदाच्या राजदूतांना ताब्यात घेऊन, प्रत्येकाचे मुंडण केले व त्यांची वस्त्रे मधोमध नितंबापर्यंत फाडून त्यांना परत पाठवून दिले. \p \v 5 जेव्हा कोणी येऊन दावीदाला त्या माणसांबद्दल सांगितले, तेव्हा दावीदाने त्यांची भेट घेण्यासाठी माणसे पाठवली, कारण त्यांचा मोठा अपमान झाला होता. राजाने म्हटले, “तुमची दाढी वाढेपर्यंत यरीहोतच राहा, मग परत या.” \p \v 6 जेव्हा अम्मोनी लोकांना समजून आले की, दावीदाला आपण घृणास्पद झालो आहोत, तेव्हा हानून व अम्मोन्यांनी अराम-नहराईम,\f + \fr 19:6 \fr*\ft म्हणजेच \ft*\fqa मेसोपोटेमियाचा उत्तरपश्चिम भाग\fqa*\f* अराम-माकाह व सोबाह येथून एक हजार तालांत\f + \fr 19:6 \fr*\ft अंदाजे 34 मेट्रिक टन\ft*\f* चांदी देऊन सैन्य, रथ व घोडदळ ही भाड्याने आणली. \v 7 त्याने भाड्याने बत्तीस हजार रथ व सारथी आणले. तसेच माकाहचा राजा व त्याचे संपूर्ण सैन्य बोलाविले. त्या सैन्याने मेदबा येथे तळ दिला. अम्मोन्यांनी आपल्या नगरातून भरती केलेल्या सैन्यासह तिथे येऊन युद्धासाठी मोर्चा बांधला. \p \v 8 हे ऐकून, दावीदाने संपूर्ण लढाऊ सैन्यासह योआबाला पाठवले. \v 9 तेव्हा अम्मोन्यांचे सैन्य बाहेर आले आणि युद्धाच्या तयारीने त्यांच्या नगराच्या दरवाजाजवळ येऊन थांबले, युद्ध करण्यासाठी आलेले राजे एकीकडे मोकळ्या प्रदेशात एकटेच होते. \p \v 10 शत्रूचे सैन्य आपल्यापुढे व मागे आहे हे योआबाला समजले; तेव्हा त्याने इस्राएली सैन्यातून उत्तम योद्धे निवडले व त्यांना अरामी सैन्याशी लढण्यास पाठविले. \v 11 बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठविले गेले. \v 12 योआब म्हणाला, “जर अरामी सैन्य माझ्यावर भारी झाले तर तुम्ही माझी सुटका करावी; परंतु जर अम्मोनी सैन्य तुझ्यावर भारी झाले तर मी तुला सोडविण्यास येईन. \v 13 खंबीर व्हा, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या परमेश्वराच्या शहरांसाठी आपण धैर्याने लढू. याहवेहच्या दृष्टीने जे बरे ते याहवेह करतील.” \p \v 14 तेव्हा योआब आणि त्याच्या बरोबरचे सैन्य अराम्यांशी लढण्यास पुढे गेले आणि ते अरामी त्याच्यापुढून पळून गेले. \v 15 जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला. \p \v 16 नंतर अरामी लोकांनी पाहिले इस्राएलकडून त्यांचा पराभव झाला आहे, तेव्हा त्यांनी दूत पाठवून फरात नदीच्या पूर्वेकडून अधिक अरामी सैन्य बोलाविले. हादादेजर राजाचा सेनापती शोफख या सेनेचे नेतृत्व करीत होता. \p \v 17 याविषयी जेव्हा दावीदाला सांगण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली सैन्य एकत्र केले आणि यार्देन नदी पार करून शत्रुसैन्याशी युद्ध सुरू केले. दावीदाने पुन्हा युद्धसीमेची खूण तयार केली व अराम्यांविरुद्ध युद्ध केले. \v 18 परंतु अरामी सैन्यांनी इस्राएल समोरून पळ काढला आणि दावीदाने त्यांच्यातील सात हजार रथस्वारांना व चाळीस हजार पायदळांना ठार मारले. त्याने त्यांचा सेनापती शोफख यालाही ठार केले. \p \v 19 जेव्हा हादादेजरच्या जहागीरदारांनी पाहिले की इस्राएलपुढे त्यांचा पराभव झाला, त्यांनी दावीदाशी समेट केला व ते त्याच्या अधीन झाले. \p यानंतर अरामी लोक पुन्हा कधीही अम्मोन्यांना त्याच्या युद्धामध्ये मदत करण्यास तयार झाले नाही. \c 20 \s1 दावीद राब्बा हस्तगत करतो \p \v 1 त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला. \v 2 दावीद तिथे पोहोचला, तेव्हा त्याने राब्बाहचा राजा मिलकोम\f + \fr 20:2 \fr*\ft किंवा \ft*\fqa मोलेख\fqa*\f* च्या डोक्यावरील मुकुट काढला—तो मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सोन्याचा एक तालांत\f + \fr 20:2 \fr*\ft अंदाजे 34 कि.ग्रॅ.\ft*\f* होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती; तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्याने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली. \v 3 आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले. \s1 दावीदाचे पलिष्ट्यांबरोबर युद्ध \p \v 4 कालांतराने, पलिष्ट्यांबरोबर गेजेर येथे युद्ध झाले, सिब्बखय नावाच्या हुशाथी मनुष्याने रेफाईमच्या वंशातील सिप्पय नावाच्या एका मनुष्याला ठार मारले, तेव्हा पलिष्टी शरण आले. \p \v 5 पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धात याईराचा पुत्र एलहानानने लहमी या गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले, ज्याच्या भाल्याची काठी विणकर्‍याच्या काठीसारखी होती. \p \v 6 आणखी गथ येथे झालेल्या दुसर्‍या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. \v 7 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले. \p \v 8 हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले. \c 21 \s1 दावीद योद्ध्यांची शिरगणती करतो \p \v 1 सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले. \v 2 म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.” \p \v 3 परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?” \p \v 4 तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला. \v 5 योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते. \p \v 6 या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता. \v 7 परमेश्वराच्या दृष्टीमध्ये देखील ही शिरगणती वाईट होती; म्हणून त्यांनी त्याबद्दल इस्राएलला शिक्षा केली. \p \v 8 तेव्हा दावीद परमेश्वराला म्हणाला, “असे करून मी मोठे पाप केले आहे. आता मी आपणास विनंती करतो, आपल्या सेवकाचा दोष दूर करा. मी मूर्खपण केले आहे.” \p \v 9 याहवेहने दावीदाचा द्रष्टा गाद याला म्हटले, \v 10 “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ” \p \v 11 तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “याहवेह असे म्हणतात: ‘तू निवड कर: \v 12 तीन वर्षाचा दुष्काळ, तुझ्या शत्रूपासून तीन महिने पलायन किंवा तीन दिवस याहवेहची तलवार; म्हणजे मरी देशात पसरून याहवेहचा दूत सर्व इस्राएलच्या भागात नाश करेल.’ आता ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.” \p \v 13 दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात पडलो आहे. मला याहवेहच्या हाती पडू दे, कारण त्यांची कृपा अतिशय अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.” \p \v 14 तेव्हा याहवेहने इस्राएल देशात मरी पाठवली आणि तिच्यामुळे सत्तर हजार लोक मरण पावले. \v 15 आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या\f + \fr 21:15 \fr*\ft अर्थात् \ft*\fqa आर्णोन\fqa*\f* खळ्याजवळ उभा होता. \p \v 16 दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले. \p \v 17 दावीदाने परमेश्वराला म्हटले, “योद्ध्यांची शिरगणती करण्यासाठी मीच आज्ञा केली होती ना? मी मेंढपाळ असून पाप केले आहे आणि चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो. परंतु तुमच्या या लोकांवर मरी राहू देऊ नका.” \s1 दावीद वेदी बांधतो \p \v 18 तेव्हा याहवेहच्या दूताने गादला दावीदाला सूचना देण्यास सांगितले की, जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध. \v 19 मग याहवेहच्या नावाने गादने जे सांगितले होते त्यानुसार दावीद वर गेला. \p \v 20 आर्णोन गव्हाची मळणी करीत होता, त्याने वळून पाहिले, तर त्याच्या दृष्टीस एक दूत पडला. आर्णोनाचे चार पुत्र सोबत होते, तिथून ते गेले व लपून राहिले. \v 21 जेव्हा दावीद जवळ गेला, आर्णोनाने त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्याने खळ्यापासून निघून दावीदासमोर भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. \p \v 22 दावीद अरवनाहला म्हणाला, “मला तुझे हे खळे दे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन. मला हे विकत दे, मी तुला त्याची संपूर्ण किंमत देईन.” \p \v 23 अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.” \p \v 24 परंतु दावीद राजाने अरवनाहला उत्तर दिले, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. जे तुझे आहे, ते मी याहवेहसाठी तसेच घेणार नाही. फुकट मिळालेले होमार्पण मी अर्पिणार नाही.” \p \v 25 मग दावीदाने आर्णोनला जागेबद्दल सोन्याची सहाशे शेकेल\f + \fr 21:25 \fr*\ft अंदाजे 6.9 कि.ग्रॅ.\ft*\f* दिली. \v 26 नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. त्याने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून त्याला उत्तर दिले. \p \v 27 मग याहवेहने देवदूताला आज्ञा दिली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत ठेवली. \v 28 याहवेहने आपल्या प्रार्थनेचे उत्तर दिले, हे पाहून दावीदाने आर्णोन यबूसीच्या खळ्यात अर्पणे वाहिली. \v 29 मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती. \v 30 परंतु दावीद परमेश्वराला प्रश्न विचारावयास त्यांच्या पुढे जाण्यास धजेना, कारण याहवेहच्या दूताच्या तलवारीने तो भयभीत झाला होता. \c 22 \p \v 1 मग दावीद म्हणाला, “याहवेह परमेश्वराचे मंदिर व इस्राएलसाठी होमबलीची वेदी याच ठिकाणी असली पाहिजे.” \s1 मंदिर बांधण्याची पूर्वतयारी \p \v 2 दावीदाने इस्राएलमध्ये राहणार्‍या सर्व परकियांना एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरासाठी चिरे घडविण्याची आज्ञा दिली. \v 3 प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला. \v 4 त्याने मोजता येणार नाहीत इतके गंधसरूचे ओंडके पुरविले, कारण सीदोन व सोर येथील लोकांनी ते प्रचंड प्रमाणात दावीदाकडे आणले होते. \p \v 5 दावीदाने विचार केला, “माझा पुत्र शलोमोन तरुण आणि अननुभवी आहे. याहवेहसाठी जे मंदिर बांधावयाचे आहे, ते संपूर्ण जगात अत्यंत भव्य, प्रसिद्ध व वैभवशाली झाले पाहिजे. म्हणून मी ते बांधण्याची पूर्वतयारी करेन.” त्याप्रमाणे आपल्या मृत्यूपूर्वी दावीदाने पुष्कळ तयारी केली. \p \v 6 नंतर त्याने त्याचा पुत्र शलोमोनला इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी एक भवन बांधण्याची जबाबदारी दिली. \v 7 दावीद शलोमोनाला म्हणाला, “याहवेह परमेश्वराच्या नावाने मंदिर बांधावयाची माझी मनापासून इच्छा होती, \v 8 परंतु माझ्याकडे याहवेहचा हा संदेश आला, ‘तू अनेक युद्ध करून पुष्कळ रक्त वाहिले आहेस. तू माझ्या नावाचे मंदिर बांधू नकोस, कारण तू या पृथ्वीवर माझ्यासमोर पुष्कळ रक्त वाहिले आहे. \v 9 परंतु तुला एक पुत्र होईल, तो शांतताप्रिय व स्वस्थचित्त मनुष्य असेल. सभोवतालच्या सर्व प्रदेशातील शत्रूपासून मी त्याला विसावा देईन. त्याचे नाव शलोमोन\f + \fr 22:9 \fr*\ft म्हणजे \ft*\fqa शांती\fqa*\f* असेल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलला शांती आणि स्वस्थता देईन. \v 10 तो माझ्या नावाचे एक मंदिर बांधील. तो माझा पुत्र होईल आणि मी त्याचा पिता होईन. मी इस्राएलावर त्याचे राजासन अनंतकालापर्यंत स्थापन करेन.’ \p \v 11 “आता माझ्या मुला, याहवेह तुझ्याबरोबर असो आणि तुला यश प्राप्त होवो आणि तू ते बांधशील असे त्यांनी सांगितल्याप्रमाणे याहवेह तुझ्या परमेश्वराचे भवन बांध. \v 12 तुझे याहवेह तुला सुबुद्धी आणि चातुर्य देवो आणि जेव्हा ते तुला इस्राएलवर अधिकार देतील, तुला त्यांच्या नियमशास्त्राचे पालन करण्याची बुद्धी देवो, म्हणजे तू याहवेह तुझ्या परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करशील. \v 13 याहवेहने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेल्या नियमांचे तू काळजीपूर्वक पालन करशील, तर तू यशस्वी होशील. बलवान हो, धैर्यवान हो. भयभीत आणि निराश होऊ नको. \p \v 14 “मी अत्यंत परिश्रम करून याहवेहच्या मंदिरासाठी एक लाख तालांत\f + \fr 22:14 \fr*\ft अंदाजे 3,400 मेट्रिक टन\ft*\f* सोने, दहा लाख तालांत\f + \fr 22:14 \fr*\ft अंदाजे 34,000 मेट्रिक टन\ft*\f* चांदी जमा केली आहे. कास्य आणि लोखंड अगणित प्रमाणात आहेत आणि लाकूड आणि दगडही आहेत. आणि तुलाही त्यात भर घालता येईल. \v 15 तुझ्याजवळ पुष्कळ कारागीर आहेत: दगड घडविणारे, गवंडी, सुतार आणि प्रत्येक प्रकारचे कामगार. \v 16 सोने आणि चांदी, कास्य आणि लोखंड—याचे अगणित कारागीर आहेत. आता काम करण्यास सुरू कर, याहवेह तुझ्याबरोबर असो.” \p \v 17 नंतर दावीदाने इस्राएलाच्या सर्व पुढार्‍यांना आपला पुत्र शलोमोनला या कामी मदत करण्याची आज्ञा दिली. \v 18 तो त्यांना म्हणाला, “याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर नाहीत का? त्यांनी सर्व क्षेत्रात तुम्हाला स्वस्थता दिली नाही का? कारण त्यांनी या प्रदेशाच्या लोकांना माझ्या अधीन केले व या भूमीवर याहवेहचा व त्यांच्या लोकांचा अधिकार आहे. \v 19 आता तुमच्या याहवेह परमेश्वराला शोधण्याकरिता तुम्ही आपले अंतःकरण आणि आपला जीव लावा. आणि याहवेह परमेश्वराचे मंदिर बांधा म्हणजे याहवेहच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधण्यात येणार आहे, त्यात तुम्हाला याहवेहच्या कराराचा कोश आणि परमेश्वराची पवित्र पात्रे आणता येतील.” \c 23 \s1 लेवी \p \v 1 जेव्हा दावीद वृद्ध व वयातीत झाला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनला इस्राएलचा राजा बनविले. \p \v 2 त्याने इस्राएलांच्या सर्व पुढार्‍यांना आणि लेवी व याजकांना एकत्र केले. \v 3 तीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लेव्यांची शिरगणती करण्यात आली. त्यांची संख्या अडतीस हजार भरली. \v 4 दावीद म्हणाला, “यापैकी चोवीस हजार लेव्यांनी याहवेहच्या मंदिराच्या कामावर मुकादम म्हणून देखरेख करावी, सहा हजार लोकांनी न्यायाधीशांची आणि अंमलदारांची कामे करावी. \v 5 चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.” \b \lh \v 6 नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी. \s1 गेर्षोनी \li1 \v 7 गेर्षोनीचे विभाग: \li2 लादान व शिमी. \li1 \v 8 लादानाचे पुत्र: \li2 यात यहीएल हा ज्येष्ठ, जेथाम व योएल—सर्व मिळून तीन. \li1 \v 9 शिमीचे पुत्र: \li2 शेलोमीथ, हजिएल व हारान; सर्व मिळून तीन. \li2 (हे लादानाचे कुटुंबप्रमुख.) \li1 \v 10 शिमीचे पुत्र: \li2 यहथ, जीजा,\f + \fr 23:10 \fr*\ft किंवा \ft*\fqa झिना\fqa*\f* यऊश आणि बरीयाह. \li2 हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार. \li2 \v 11 (यहथ हा ज्येष्ठ होता, जीजाह हा दुसरा होता, परंतु यऊश आणि बरीयाह यांना पुष्कळ पुत्र नव्हते; म्हणून ते एकच कुटुंब म्हणून ओळखले जात.) \s1 कोहाथी \li1 \v 12 कोहाथाचे पुत्र: \li2 अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र. \li1 \v 13 अम्रामचे पुत्र: \li2 अहरोन व मोशे. \li2 अहरोनाला आणि त्याच्या वंशाला सर्वकाळाकरिता वेगळे करण्यात आले, जेणेकरून त्यांनी याहवेहसाठी अतिपवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या नावाने अनंतकालाकरिता आशीर्वाद द्यावे. \v 14 परमेश्वराचा मनुष्य मोशे याच्या पुत्रांचाही समावेश लेवीच्या गोत्रात केला होता. \li1 \v 15 मोशेचे पुत्र: \li2 गेर्षोम व एलिएजर. \li1 \v 16 गेर्षोमाचे वंशज: \li2 शबुएल प्रथमपुत्र होता. \li1 \v 17 एलिएजरचे वंशज: \li2 रहब्याह प्रथमपुत्र होता. \li2 (एलिएजरला दुसरा पुत्र नव्हता, परंतु रहब्याहाला पुष्कळ पुत्र झाले.) \li1 \v 18 इसहारचे पुत्र: \li2 शेलोमीथ प्रथमपुत्र होता. \li1 \v 19 हेब्रोनाचे पुत्र: \li2 यरीयाह हा प्रथमपुत्र होता, अमर्‍याह दुसरा, \li2 यहजिएल तिसरा आणि यकमाम चौथा. \li1 \v 20 उज्जीएलाचे पुत्र: \li2 मीखाह हा प्रथमपुत्र व इश्शीयाह दुसरा. \s1 मरारी \li1 \v 21 मरारीचे पुत्र: \li2 महली व मूशी. \li1 महलीचे पुत्र: \li2 एलअज़ार व कीश. \li2 \v 22 एलअज़ारला पुत्र नव्हता: त्याला फक्त कन्याच होत्या. त्यांचे चुलतभाऊ कीशपुत्र यांनी त्यांच्याशी विवाह केले. \li1 \v 23 मूशीचे पुत्र: \li2 महली, एदर व यरेमोथ; सर्व मिळून तीन. \b \lf \v 24 लेव्याच्या शिरगणतीमधील सर्व लेवी पुरुष—ज्या कुटुंब प्रमुखांची नावे समाविष्ट केली व त्यांची नावनोंदणी झाली, जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते, त्या सर्वांना याहवेहच्या मंदिरात सेवाकार्य दिले गेले. \v 25 कारण दावीद म्हणाला होता, “इस्राएलाच्या याहवेह परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे आणि यरुशलेमात निरंतर निवास करण्यास ते आले आहेत. \v 26 म्हणून लेव्यांना निवासमंडप व इतर सर्व सेवा साधने एका जागेवरून दुसर्‍या जागी नेण्याची गरज राहणार नाही.” \v 27 दावीदाच्या शेवटच्या सूचनेनुसार, वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लेवींची शिरगणती केली गेली. \b \p \v 28 लेव्यांचा कार्यभाग, अहरोनाच्या वंशजांना याहवेहच्या मंदिराच्या सेवेत याप्रमाणे मदत करावी: अंगणाची देखरेख, इतर खोल्यांची देखरेख, सर्व पवित्र वस्तूंचे शुद्धीकरण आणि परमेश्वराच्या भवनातील इतर कामे करणे. \v 29 त्यांना समक्षतेची भाकर टेबलावर ठेवणे, अन्नार्पणांसाठी लागणारे विशिष्ट सपीठ ठेवणे, बेखमीर पापड्या तयार करणे, भाजणे व मिश्रण तयार करणे व सर्व वजन आणि मापाचे प्रमाण बघणे या जबाबदाऱ्या होत्या. \v 30 दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत. \v 31 शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते. \p \v 32 याप्रमाणे याहवेहच्या मंदिरात लेवी सभामंडपाची आणि पवित्रस्थानाची काळजी घेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत असत आणि त्यांचे नातलग अहरोनाचे वंशज यांच्या मदतनीसाचे काम करीत असत. \c 24 \s1 याजकांचे विभाजन \p \v 1 अहरोनाच्या वंशजाची विभागणी: \p अहरोनाचे पुत्र नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार. \v 2 नादाब व अबीहू हे अहरोनाचे पुत्र, ते अहरोना आधीच मृत्यू पावले होते. त्यांना पुत्र नव्हते; म्हणून याजकाचे कार्य एलअज़ार व इथामार हे करीत. \v 3 दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली. \v 4 एलअज़ाराच्या वंशात इथामाराच्या वंशापेक्षा अधिक पुढारी होते आणि त्यांची त्यानुसार विभागणी करण्यात आली: एलअज़ाराच्या वंशातून सोळा कुटुंबप्रमुख आणि इथामाराच्या वंशातून आठ कुटुंबप्रमुख असे विभागण्यात आले. \v 5 कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते. \p \v 6 लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले. \b \li1 \v 7 प्रथम चिठ्ठी यहोयारीबच्या नावे आली, \li1 दुसरी यदायाह, \li1 \v 8 तिसरी हारीम, \li1 चवथी सोरीम, \li1 \v 9 पाचवी मल्कीयाह, \li1 सहावी मियामीन, \li1 \v 10 सातवी हक्कोस, \li1 आठवी अबीयाह, \li1 \v 11 नववी येशूआ, \li1 दहावी शखन्याह, \li1 \v 12 अकरावी एल्याशीब, \li1 बारावी याकीम, \li1 \v 13 तेरावी हुप्पाह, \li1 चौदावी येशेबियाब, \li1 \v 14 पंधरावी बिल्गाह, \li1 सोळावी इम्मेरा, \li1 \v 15 सतरावी हेजीरा, \li1 अठरावी हप्पिसेसा, \li1 \v 16 एकोणविसावी पथह्याह, \li1 विसावी यहेज्केल, \li1 \v 17 एकविसावी याखीन, \li1 बाविसावी गामूल, \li1 \v 18 तेविसावी दलायाह, \li1 चोविसावी माझियाह. \b \p \v 19 त्या सर्वांचा पूर्वज अहरोनला याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराने नेमून दिलेली सेवा विधीनुसार पार पाडण्याची जशी आज्ञा होती, त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करीत. \s1 बाकीचे लेवी \lh \v 20 लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती: \b \li1 अम्रामाचे पुत्र: शूबाएल; \li2 शूबाएलाचे पुत्र: यहदायाह. \li1 \v 21 रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र. \li1 \v 22 इसहारचे पुत्र: शलोमोथ; \li2 शलोमोथाचे पुत्र: यहथ. \li1 \v 23 हेब्रोनाचे पुत्र: \li2 यरीयाह प्रथमपुत्र, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम चौथा. \li1 \v 24 उज्जीएलाचे पुत्र: मीखा; \li2 मीखाहच्या पुत्रांपैकी: शामीर. \li1 \v 25 मीखाहचा भाऊ: इश्शीयाह; \li2 इश्शीयाचे पुत्र: जखर्‍याह. \li1 \v 26 मरारीचे पुत्र: महली व मूशी. \li2 याजीयाहचा पुत्र: बनो. \li1 \v 27 मरारीचे पुत्र: \li2 याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री. \li1 \v 28 महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता. \li1 \v 29 कीशाकडून: कीशाचा पुत्र: यरहमेल. \li1 \v 30 मूशीचे पुत्र: महली, एदर व यरिमोथ. \b \lf हे लेव्यांचे वंशज आपआपल्या कुटुंबाप्रमाणे होते. \b \p \v 31 अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली. \c 25 \s1 मंदिराचे संगीतकार \p \v 1 दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे: \b \li1 \v 2 आसाफच्या पुत्रा मधून: \li2 जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत. \li1 \v 3 यदूथून व त्याचे पुत्र: \li2 गदल्याह, सरी, यशायाह, शिमी, हशब्याह आणि मत्तिथ्याह, सर्व मिळून सहाजण, संदेश देणारे त्यांचे पिता यदूथूनच्या नेतृत्वाखाली वीणा वाजवून याहवेहचे उपकारस्मरण व स्तवन करीत असत. \li1 \v 4 हेमान व त्याचे पुत्र: \li2 बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते. \v 5 (हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.) \b \p \v 6 हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत. \p आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत. \v 7 ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते. \v 8 तरुण वा वयस्कर, तसेच शिक्षक वा शिष्य या सर्व गायकांची चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जाई. \b \li1 \v 9 पहिली चिठ्ठी निघाली आसाफ, योसेफ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12\f + \fr 25:9 \fr*\ft \+xt वचन 7|link-href="1CH 25:7"\+xt* मध्ये एकूण संख्या पहा; हिब्रूमध्ये संख्या 12 नाहीत.\ft*\f*, \li1 दुसरी गदल्याहची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 10 तिसरी जक्कूरा, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 11 चौथी इज्री,\f + \fr 25:11 \fr*\ft किंवा \ft*\fqa झेरी\fqa*\f* त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 12 पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 13 सहावी बुक्कीयाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 14 सातवी यसारेलाह,\f + \fr 25:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa असारेलाह\fqa*\f* त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 15 आठवी यशायाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 16 नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 17 दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 18 अकरावी अजरएल,\f + \fr 25:18 \fr*\ft किंवा \ft*\fqa उस्सीएल\fqa*\f* त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 19 बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 20 तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 21 चौदावी मत्तिथ्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 22 पंधरावी यरेमोथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 23 सोळावी हनन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 24 सतरावी योश्बेकाशाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 25 अठरावी हनानी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 26 एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 27 विसावी एलियाथाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 28 एकविसावी होथीर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 29 बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 30 तेविसावी महजिओथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12, \li1 \v 31 चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12. \c 26 \s1 द्वारपाल \lh \v 1 द्वारपालांचे विभाजन: \b \lh कोरहा पासून: \li1 कोरही पुत्र मशेलेम्याह, आसाफाचा एक पुत्र होता. \v 2 मशेलेम्याहचे पुत्र: \li2 जखर्‍याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा, \li2 जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा, \li2 \v 3 एलाम पाचवा, यहोहानान सहावा \li2 व एलिओएनाइ सातवा. \li1 \v 4 ओबेद-एदोमासही पुत्र होते: \li2 शमायाह प्रथमपुत्र, यहोजाबाद दुसरा, \li2 योवाह तिसरा, साखार चवथा, \li2 नथानेल पाचवा, \v 5 अम्मीएल सहावा, \li2 इस्साखार सातवा व पउलथय आठवा. \li2 (कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.) \li1 \v 6 ओबेद-एदोमाचा पुत्र शमायाहला सुद्धा पुत्र झाले, ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते, कारण ते सक्षम पुरुष होते. \v 7 शमायाहचे पुत्र: \li2 अथनी, रफाएल, ओबेद, एलजाबाद; \li2 आणि त्यांचे बंधू अलीहू आणि समख्याह हे सक्षम पुरुष होते. \lf \v 8 हे सर्व ओबेद-एदोमाचे वंशज होते; ते आणि त्यांचे कुटुंब हे सर्वच सक्षम—काम करण्यास समर्थ पुरुष होते—ओबेद-एदोमाचे वंशज, सर्व मिळून 62. \lf \v 9 मशेलेम्याहचे पुत्र व नातेवाईक सुद्धा शूर पुरुष होते—सर्व मिळून 18. \b \li1 \v 10 मरारी होसाहचे पुत्र: \li2 शिम्री पहिला (तो प्रथमपुत्र नसतानाही त्याच्या पित्याने त्याला पुढारी नेमले). \li2 \v 11 हिल्कियाह दुसरा, तबालियाह तिसरा, \li2 जखर्‍याह चौथा. \lf होसाहचे पुत्र व नातेवाईक मिळून एकंदर 13. \b \lh \v 12 ज्याप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्याच प्रकारे सर्व विभाजित द्वारपालांना त्यांच्या पुढार्‍यांव्दारे याहवेहच्या मंदिराची सेवा देण्यात आली. \v 13 प्रत्येक द्वारांसाठी, लहान थोर सारखेच समजून त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. \li1 \v 14 पूर्वेकडील द्वारासाठी शेलेम्याहच्या\f + \fr 26:14 \fr*\ft किंवा \ft*\fqa मशेलेमाह\fqa*\f* नावाची चिठ्ठी निघाली. \li1 उत्तरेकडील द्वाराची त्याचा पुत्र जखर्‍याहकडे गेली, जो एक बुद्धिमान सल्लागार होता. \li1 \v 15 दक्षिणेकडील द्वार ओबेद-एदोम आणि त्याच्या पुत्रांच्या ताब्यात कोठारे दिली गेली. \li1 \v 16 पश्चिमेकडील द्वाराची व शल्लेकेथ द्वाराशी चढून जाण्याच्या मार्गावर पहारा देण्याची जबाबदारी शुप्पीम व होसाह यांच्याकडे आली. \b \lh द्वारपाल पहारेकऱ्यांसह उभे असत: \li1 \v 17 पूर्वेच्या द्वारासाठी रोज सहा लेवी, \li1 उत्तरेच्या द्वारासाठी चार रक्षक, \li1 दक्षिणेच्या द्वारासाठी चार रक्षक \li1 आणि भांडारावर एकाच वेळी प्रत्येकी दोन. \li1 \v 18 न्यायालयाच्या पश्चिमेकडील द्वारांसाठी मार्गावर चार व न्यायालयात दोन रक्षक. \b \lf \v 19 हे द्वारपालांचे विभाजित वर्ग कोरही आणि मरारी वंशातील होते. \s1 खजिनदार व इतर अधिकारी \p \v 20 अहीयाह लेवीस परमेश्वरासाठी मंदिराचे खजिनदार आणि वाहिलेल्या अर्पणांची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले. \p \v 21 लादानाचे वंशज, जे लादान गेर्षोनी होते व जे गेर्षोनी लादानाचे यहीएली कुटुंबप्रमुखांचा समावेश होता. \v 22 यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते. \b \lh \v 23 अम्रामी पासून इसहारी हेब्रोनी व उज्जीएली: \b \li2 \v 24 मोशेचा पुत्र गेर्षोमच्या वंशातील शबुएल खजिन्यावर प्रमुख अधिकारी होता. \v 25 एलिएजरपासून त्याचे नातेवाईक: त्याचा पुत्र रहब्याह, त्याचा पुत्र यशायाह, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिक्री, व त्याचा पुत्र शेलोमीथ. \li2 \v 26 (हा शेलोमीथ आणि त्याचे नातेवाईक दावीद राजाने, हजार सैनिकांचे, शताधिपतींच्या आणि इतर सैनिकांच्या सेनाधिकारींचे कुटुंबप्रमुख, या सर्वांनी अर्पण केलेल्या भांडार वस्तूंची काळजी घेत. \v 27 लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत. \v 28 शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.) \li2 \v 29 इसहार्‍यांपैकी: \li2 कनन्याह आणि त्याचे पुत्र यांची नेमणूक मंदिरापासून दूर इस्राएली लोकांवर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून करण्यात आली. \li2 \v 30 हेब्रोन्यांपैकी: \li2 हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. \v 31 हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता. \li2 (दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले. \v 32 येरीह कडे 2,700 कुटुंब होते, जे सक्षम असून कुटुंबप्रमुख होते. दावीद राजाने त्यांना रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र यांच्या परमेश्वरा संबंधित धार्मिक व सामाजिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले.) \c 27 \s1 सेनेचे विभाग \lh \v 1 इस्राएली लोकांची यादी—कुटुंबप्रमुख, हजार सैनिकांचा अधिकारी आणि शंभर सैनिकांचा अधिकारी आणि त्यांचे मुख्य अधिकारी, दरवर्षी प्रत्येक महिन्यात राजाच्या सर्व लष्करी सेवेसाठी या सैन्य विभागांना बोलाविले जात असे. प्रत्येक विभागात 24,000 पुरुष सैनिक असत. \b \li1 \v 2 पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते. \v 3 तो पेरेसाच्या वंशातील होता आणि त्याच्या नेतृत्वाची सैन्य तुकडी पहिल्या महिन्यात कामावर असे. \li1 \v 4 अहोही दोदय हा दुसर्‍या महिन्याच्या विभागाचा सेनापती होता; मिकलोथ त्यांचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 5 तिसर्‍या महिन्याच्या सैन्य विभागाचा सेनापती, प्रमुख याजक यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \v 6 बेनाइयाह दावीदाच्या सैन्यातील पहिल्या तीस योद्ध्यापैकी एक व त्या तिसांचा अधिकारी होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद सैन्य तुकडीचा सेनापती होता. \li1 \v 7 चौथ्या महिन्याचा चवथा सेनापती योआबाचा भाऊ असाहेल होता; त्याच्यानंतर त्याचा पुत्र जबद्याह त्याच्या जागी आला. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 8 पाचव्या महिन्याचा पाचवा सेनापती इज्राही शम्हूथ होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 9 सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 10 सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस होता, तो एफ्राईमी असून पलोन येथील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 11 आठव्या महिन्याचा आठवा सेनापती जेरह कुळातील हुशाथी सिब्बखय होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 12 नवव्या महिन्याचा नववा सेनापती बिन्यामीन अनाथोथी अबिएजेर होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 13 दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती माहाराई, नटोफाथी जेरही होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 14 अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती पिराथोनचा एफ्राईमी बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \li1 \v 15 बाराव्या महिन्याचा बारावा सेनापती नटोफाथी हेल्दय असून तो ओथनिएलाच्या कुटुंबातील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. \s1 गोत्रप्रमुख \lh \v 16 इस्राएलांचे गोत्रप्रमुख हे होते: \b \li1 रऊबेन गोत्रावर: जिक्रीचा पुत्र एलिएजर; \li1 शिमओनी गोत्रावर: माकाहचा पुत्र शफात्याह; \li1 \v 17 लेवी गोत्रावर: कमुवेलाचा पुत्र हशब्याह; \li1 अहरोन गोत्रावर: सादोक; \li1 \v 18 यहूदाह गोत्रावर: दावीद राजाचा बंधू अलीहू; \li1 इस्साखार गोत्रावर: मिखाएलचा पुत्र ओमरी; \li1 \v 19 जबुलून गोत्रावर: ओबद्याहचा पुत्र इश्मायाह; \li1 नफताली गोत्रावर: अज्रीएलचा पुत्र यरिमोथ; \li1 \v 20 एफ्राईमच्या गोत्रावर: अजज्याहचा पुत्र होशेय; \li1 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: पदायाहचा पुत्र योएल; \li1 \v 21 गिलआदातील मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: जखर्‍याहचा पुत्र इद्दो; \li1 बिन्यामीन गोत्रावर: अबनेरचा पुत्र यासीएल; \li1 \v 22 दान गोत्रावर: यरोहामाचा पुत्र अजरएल. \b \lf हे सर्व इस्राएलचे गोत्रप्रमुख होते. \b \p \v 23 दावीदाने शिरगणती केली, तेव्हा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा त्या गणतीमध्ये समावेश केला नव्हता, कारण याहवेहने इस्राएली लोकांची संख्या आकाशातील ताऱ्यांसारखी अगणित करण्याचे वचन दिले होते. \v 24 जेरुइयाहचा पुत्र योआबाने गणती सुरू केली, परंतु तो ती पूर्ण करू शकला नाही. कारण इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि गणतीची पूर्ण संख्या दावीद राजाच्या इतिहासात लिहिली गेली नाही. \s1 राजाचे पर्यवेक्षक \li1 \v 25 अदिएलाचा पुत्र अजमावेथ राजाचा भांडारपाल होता. \li1 उज्जीयाहचा पुत्र योनाथान इस्राएलातील सर्व सीमापार नगरे, गावे आणि किल्ले यांचा विभागीय भांडारपाल होता. \li1 \v 26 कलूबाचा पुत्र एज्री राजाच्या जमिनीची लागवड करणार्‍या कामकर्‍यांवर अधिकारी होता. \li1 \v 27 रामाही शिमी राजाच्या द्राक्षमळ्यांवर देखरेख करणारा होता. \li1 जब्दी शिफमी द्राक्षारस बनविणे व त्याचा साठा करणे यास जबाबदार होता. \li1 \v 28 गदेर येथील बआल-हानान राज्याच्या पश्चिमी डोंगरपायथ्यातील जैतुनाच्या व उंबराच्या झाडांची देखरेख करत असे. \li1 योआश जैतून तेलाच्या पुरवठ्याचा प्रमुख होता. \li1 \v 29 शारोनाच्या मैदानात चरणार्‍या कळपांवर शारोनी शित्रेय देखरेख करत असे. \li1 खोर्‍यातील कळपांवर अदलयचा पुत्र शाफाट हा देखरेख करत असे. \li1 \v 30 इश्माएली प्रांतातला ओबील उंटांवर देखरेख करत असे. \li1 गाढवांवर मेरोनोथी यहदायाह देखरेख करत असे. \li1 \v 31 मेंढरांवर हगरी येथील याजीज देखरेख करत असे. \lf हे सर्व दावीद राजाच्या मालमत्तेवर देखरेख ठेवणारे अधिकारी होते. \b \li1 \v 32 दावीदाचा चुलता योनाथान हा सुशिक्षित असून उत्तम सल्लागार व लेखनिक होता. \li1 हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांचा शिक्षक होता. \li1 \v 33 अहीथोफेल राजाचा सल्लागार होता. \li1 हूशाई अर्की खाजगी सल्लागार होता. \lf \v 34 बेनाइयाहचा पुत्र यहोयादा आणि अबीयाथार नंतर अहीथोफेल त्यांच्या जागी आला. \li1 योआब राजाच्या शाही सेनेचा सरसेनापती होता. \c 28 \s1 मंदिर बांधण्याची दावीदाची योजना \p \v 1 दावीदाने इस्राएलच्या सर्व अधिकार्‍यांना यरुशलेम येथे एकत्र बोलाविले: त्यात गोत्रावरील अधिकारी, राजकीय सेवेतील विभागीय अधिकारी, हजार सैन्याचे आणि शंभर सैन्याचे सैन्याधिकारी, राजा आणि राजपुत्र यांच्या स्थावर मालमत्तेची आणि पशुधनाची देखरेख करणारे अधिकारी, युद्ध सैनिक व सर्व वीर योद्धे यांचा समावेश होता. \p \v 2 राजा दावीद उभा राहिला व म्हणाला: “माझ्या इस्राएली बंधूंनो, माझ्या लोकांनो, माझे ऐका. याहवेहच्या पवित्र कराराच्या कोशासाठी आणि परमेश्वराच्या पादास्थानासाठी एक भवन असावे म्हणून मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. आणि मी मंदिर बांधावयास योजना केली आहे. \v 3 परंतु परमेश्वराने मला सांगितले आहे, ‘तू माझ्या नामासाठी भवन बांधणार नाही, कारण तू योद्धा आहेस आणि तू रक्तपात केला आहेस.’ \p \v 4 “तरीपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने माझ्या सर्व घराण्यातून इस्राएलावर सदासर्वदा राज्य करण्यासाठी मला राजा म्हणून निवडले आहे. त्यांनी प्रथम यहूदाहच्या गोत्राची आणि या गोत्रातून माझ्या पित्याच्या घराण्याची आणि माझ्या पित्याच्या सर्व पुत्रांमधून माझी निवड करून आनंद मानला असून मला इस्राएलावर राजा केले आहे. \v 5 याहवेहने मला पुष्कळ पुत्र दिलेले आहेत—माझ्या अनेक पुत्रांमधून—याहवेहने इस्राएलींच्या राजगादीवर बसण्यासाठी माझा पुत्र शलोमोन याची निवड केली. \v 6 याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. \v 7 त्याने माझ्या आज्ञा आणि सूचना आतापर्यंत पाळल्या, त्याप्रमाणे जर तो यापुढेही काटेकोरपणाने पाळल्या, तर मी त्याचे राज्य सदासर्वकाळ टिकवेन.’ \p \v 8 “म्हणून आता सर्व इस्राएलसमोर, याहवेहच्या लोकांसमोर आणि आपल्या परमेश्वराच्या ऐकिवात: मी तुम्हाला सूचना देत आहे की याहवेह परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही ही उत्तम भूमी ताब्यात घेऊन, ती सदासर्वदा तुमच्या वंशजांना वारसाहक्क म्हणून देता येईल. \p \v 9 “आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील. \v 10 म्हणून आता तू लक्ष दे, याहवेहने त्यांचे पवित्र मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे. शक्तिशाली हो आणि ते कार्य पूर्ण कर.” \p \v 11 नंतर दावीदाने मंदिराची नियोजित जागा, तेथील भवने, भांडारगृहे, वरच्या खोल्या, आतील खोल्या, तसेच प्रायश्चिताची जागा यांचा नकाशा शलोमोनाला दिला. \v 12 पवित्र आत्म्याने ज्या योजना त्याच्या मनात घातल्या होत्या त्या याहवेहच्या मंदिराच्या अंगणाचा, सभोवतालच्या खोल्यांचा, परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यांचा व समर्पित वस्तूंच्या कोठारांचाही नकाशा त्याला दिला. \v 13 याजक व लेवी यांच्या विभागांच्या कामकाजाच्या सूचनाही राजाने शलोमोनाला दिल्या, त्याचप्रमाणे याहवेहच्या मंदिरातील भक्ती व सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा तपशीलही त्याने त्याला दिला. \v 14 त्याने वजन करून निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या सोन्याच्या पात्रांसाठी लागणारे पुरेसे सोने व निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी लागणारी पुरेशी चांदी दिली. \v 15 दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली. \v 16 त्याने समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी व इतर सोन्याच्या मेजांसाठी सोने तोलून दिले. त्याने चांदीच्या मेजांसाठीसुध्दा चांदी तोलून दिली. \v 17 शुद्ध सोन्याचे काटेरी चमचे, शिंपडण्यासाठी लागणारे कटोरे आणि प्याले; सोन्याच्या प्रत्येक ताटासाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक ताटासाठी चांदी तोलून दिली; \v 18 आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्‍या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला. \p \v 19 दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.” \p \v 20 दावीद त्याचा पुत्र शलोमोनला हे देखील म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि कामास लाग, भिऊ नकोस किंवा खचू नकोस, कारण याहवेह परमेश्वर, माझे परमेश्वर तुझ्याबरोबर आहेत. याहवेहच्या मंदिराचे प्रत्येक कार्य योग्यप्रकारे सिद्धीस जाईपर्यंत ते तुझा त्याग करणार नाहीत किंवा तुला अपयश देणार नाहीत. \v 21 याजक आणि लेवी यांच्या विभागणी प्रमाणे परमेश्वराच्या मंदिरातील सर्व कामे करण्यास तयार आहेत आणि तसेच निरनिराळ्या कारागिरीमध्ये कुशल असलेला प्रत्येक उत्सुक मनुष्य तुला सर्व कामात मदत करण्यास तयार आहे. अधिकारी वर्ग आणि सामान्य लोक तुझ्या प्रत्येक आज्ञेप्रमाणे वागतील.” \c 29 \s1 मंदिर बांधण्यासाठी देणग्या \p \v 1 नंतर सर्व जमलेल्या सभेला दावीद राजा म्हणाला: “माझा पुत्र शलोमोन, ज्याची निवड परमेश्वराने केली आहे, तो अजून तरुण आणि अननुभवी आहे. आणि हे कार्य महान आहे, कारण हे भव्यदिव्य मंदिर मानवाकरिता नव्हे, तर खुद्द याहवेह परमेश्वरासाठी आहे. \v 2 माझ्या उपलब्धींचा उपयोग करून परमेश्वराच्या मंदिरासाठी जितक्या वस्तू गोळा करता येतील, तितक्या मी केल्या आहेत—सोन्याच्या कामासाठी सोने, चांदीच्या कामासाठी चांदी, कास्याच्या कामासाठी कास्य, लोखंडाच्या कामासाठी लोखंड, लाकडाच्या कामासाठी लाकूड, गोमेद आणि जडावाच्या कामासाठी रंगीबेरंगी पाचूरत्न, उत्तम रत्ने, संगमरवरी पाषाण—मी गोळा केले आहेत. \v 3 माझा भक्तिभाव माझ्या परमेश्वराच्या मंदिरावर आहे, म्हणून माझ्या व्यक्तिगत खजिन्यातून जो सोने आणि चांदीचा मी संग्रह केला आहे, तो मी परमेश्वराच्या मंदिरासाठी देतो. याव्यतिरिक्त या पवित्र मंदिरासाठी मी दिले आहे: \v 4 ओफीराचे तीन हजार तालांत\f + \fr 29:4 \fr*\ft अंदाजे 100 मेट्रिक टन\ft*\f* सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत\f + \fr 29:4 \fr*\ft अंदाजे 235 मेट्रिक टन\ft*\f* शुद्ध चांदी. \v 5 सर्व सोने आणि चांदीची कामे कारागिरांकडून करण्यात येतील. आता स्वेच्छेने याहवेहसाठी स्वतःचे पवित्रीकरण करण्यास कोण तयार आहे?” \p \v 6 मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले. \v 7 परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी पाच हजार तालांत\f + \fr 29:7 \fr*\ft अंदाजे 170 मेट्रिक टन\ft*\f* आणि दहा हजार दारिक\f + \fr 29:7 \fr*\ft अंदाजे 84 कि.ग्रॅ.\ft*\f* सोने, दहा हजार तालांत\f + \fr 29:7 \fr*\ft अंदाजे 340 मेट्रिक टन\ft*\f* चांदी, अठरा हजार तालांत\f + \fr 29:7 \fr*\ft अंदाजे 610 मेट्रिक टन\ft*\f* कास्य आणि एक लाख तालांत\f + \fr 29:7 \fr*\ft अंदाजे 3,400 मेट्रिक टन\ft*\f* लोखंड दिले. \v 8 ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली. \v 9 पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला. \s1 दावीदाची प्रार्थना \p \v 10 दावीदाने सर्व सभेदेखत याहवेहची स्तुती केली, तो म्हणाला, \q1 “हे याहवेह परमेश्वरा, \q2 आमच्या इस्राएलच्या पित्याच्या परमेश्वरा, \q2 अनादि ते अनंतकालापर्यंत तुमची स्तुती असो. \q1 \v 11 याहवेह, तुमचे सामर्थ्य व महिमा महान आहे; \q2 गौरव, वैभव व ऐश्वर्य ही सदासर्वकाळ तुमचीच असो, \q2 पृथ्वीवरील व स्वर्गातील सर्वकाही तुमचेच आहे! \q1 याहवेह, हे सर्व तुमचेच राज्य आहे; \q2 तुमचे प्रभुत्व सर्वांवर आहे. \q1 \v 12 श्रीमंती व सन्मान तुमच्याकडूनच येतात; \q2 तुम्ही सर्व गोष्टीचे शासक आहात. \q1 सर्वांना मोठेपणा व सामर्थ्य देण्याकरिता \q2 केवळ तुमच्याच बाहूत सामर्थ्य आणि अधिकार आहे. \q1 \v 13 आता, हे आमच्या परमेश्वरा, आम्ही तुमचे उपकार मानतो, \q2 आणि तुमच्या वैभवी नावाची स्तुती करतो. \p \v 14 “परंतु मी कोण, माझी शक्ती आणि माझे लोक कोण, जे तुम्हाला इतक्या उदारतेने दान देऊ शकतील? आमच्याजवळचे सर्वकाही तुमच्याकडूनच मिळालेले आहे आणि तेच आम्ही तुम्हाला देत आहोत. \v 15 आम्ही तुमच्या दृष्टीने आमच्या पूर्वजांप्रमाणे परकीय व अगांतुक आहोत. आमचे पृथ्वीवरील दिवस एखाद्या सावलीप्रमाणे आहेत, काही आशा न ठेवता ते नाहीसे होतील. \v 16 हे आमच्या याहवेह परमेश्वरा, तुमच्या पवित्र नावासाठी, तुमचे मंदिर बांधण्यास जे प्रचंड साहित्य आम्ही गोळा केले आहे, ते सर्व तुमच्याकडून मिळाले आहे, हे सर्वकाही तुमचेच आहे. \v 17 माझ्या परमेश्वरा, मी जाणतो, तुम्ही हृदयाची परीक्षा घेता आणि खरेपणाने प्रसन्न होता. मी या सर्व वस्तू स्वखुशीने व प्रामाणिक हेतूने दिल्या आहेत. आणि आता हे बघून मला आनंद झाला की तुमच्या लोकांनीही किती आनंदाने स्वखुशीने या देणग्या दिल्या आहेत. \v 18 हे याहवेह, आमच्या पित्या अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल यांच्या परमेश्वरा, तुमच्या लोकांच्या मनात या इच्छा कायम राखा आणि त्यांचे अंतःकरण तुमच्याशी एकनिष्ठ राहू द्या. \v 19 माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.” \p \v 20 नंतर दावीद सर्व मंडळीला म्हणाला, “तुमच्या याहवेह परमेश्वराची स्तुती करा.” म्हणून त्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे याहवेह परमेश्वराची मस्तके लववून, दंडवते घालून, त्यांचा राजा याहवेहची स्तुती केली. \s1 राजा म्हणून शलोमोनचा स्वीकार \p \v 21 दुसर्‍या दिवशी त्यांनी याहवेहसाठी यज्ञ व होमबली अर्पण केले: एक हजार गोर्‍हे, एक हजार मेंढे आणि एक हजार कोकरे, सोबत पेयार्पणे, तसेच इस्राएलींच्या वतीने इतर विपुल अर्पणे वाहिली. \v 22 त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. \p नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्‍यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला. \v 23 अशा रीतीने शलोमोन त्याचा पिता दावीदानंतर राजा झाला आणि याहवेहच्या सिंहासनावर बसला. त्याची भरभराट झाली व सर्व इस्राएली लोक त्याच्या आज्ञेत राहिले. \v 24 सर्व अधिकारी आणि शूरवीर सैनिक, दावीद राजांच्या पुत्रांनी राजा शलोमोनशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले. \p \v 25 याहवेहने शलोमोनाला इस्राएलीदेखत सर्वाधिक सन्मान दिला आणि इस्राएलमध्ये कोणत्याही राजाला त्याच्यासारखे शाही ऐश्वर्य दिले नव्हते. \s1 दावीदाचा मृत्यू \p \v 26 अशाप्रकारे इशायाचा पुत्र दावीदाने सर्व इस्राएलावर राज्य केले. \v 27 दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले. \v 28 तो वयोवृद्ध होऊन मरण पावला, त्याने दीर्घायुष्य घालविले, संपत्ती आणि मान मिळविला. त्याच्या जागी त्याचा पुत्र शलोमोन राज्य करू लागला. \p \v 29 दावीद राजाच्या कारकिर्दीतील घटना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्रष्टा शमुवेल, संदेष्टा नाथान आणि द्रष्टा गाद यांच्या ग्रंथात लिहिल्या आहेत. \v 30 त्याच्या राज्याचा सर्व वृत्तांत, त्याचे सामर्थ्य, त्याच्यावर आणि इस्राएलावर आणि इतर शेजारील राष्ट्रांच्या राजांवर जे बरे वाईट प्रसंग आले, ते सर्व या ग्रंथात नमूद केले आहेत.